पालिकेच्या ऑनलाइन सेवेमुले इमारत बांधकामाच्या प्रस्तावाना 60 दिवसात मंजूरी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 May 2016

पालिकेच्या ऑनलाइन सेवेमुले इमारत बांधकामाच्या प्रस्तावाना 60 दिवसात मंजूरी

मुंबई / प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकेच्या इमारत आणि प्रस्ताव विभागाचे सर्व प्रस्ताव ऑनलाइन मंजूर केले जाणार आहेत. यामुले इमारत बांधकामाच्या परवानग्या मिळण्यास एक वर्षाच्या कालावधी लागत असायचा आता तो त्या परवानग्या आता 60 दिवसांमधे मिळणार असल्याची माहिती मुख्य अभियंता विनोद चिठोरे यांनी सांगितले.


इमारत बांधकामाचे प्रस्ताव मंजूर करताना पालिकेच्या 14 विविध विभागाच्या परवानग्या लागत असून 89 काउंटरवर पैसे भरावे लागतात. इमारत बांधकामाची परवानागी आता ऑनलाइन मिळणार असल्याने लवकरात लवकर बांधकामे करणे शक्य असल्याचे चिठोरे म्हणाले. ऑनलाइन मंजूरी मुले बिल्डर, आर्किटेक याना आपले प्रस्ताव कुठल्या विभागात आहेत याची माहिती उबलब्ध होणार असताना सामान्य नागरीकानाही अश्या प्रस्तावांची माहिती वेबसाईटवर पाहता येणार असल्याचे चिठोरे म्हणाले.

मागील एक वर्षात ऑनलाइन सेवा 80 टक्के सुरु असताना 1163 प्रस्ताव पालिकेकडे आले. त्यापैकी 524 प्रस्ताव मंजूर झाले असून 271 प्रकरणात आयओडी दिली असून 99 प्रकरणात सीसी दिली आहे. ऑनलाइन सेवा केल्यामुले आणि 1960 पासूनच्या 1 लाख 70 हजार जुन्या फाइली वेबसाईटवर उपलब्ध असल्याने विभागाकड़े माहिती अधिकारात येणारे अर्ज 30 ते 35 टक्के कमी झाल्याचे चिठोरे यांनी सांगितले.

इमारत बांधकामासाठी लागणाऱ्या परवानग्या मिलाव्या म्हणून एअरपोर्ट एथोरिटी आणि न्याशनल म्यानुमेंट एथोरिटी यांच्याशी सलग्न करण्यात आले असून येणाऱ्या काळात म्हाडा, एमएमआरडीए, हेरिटेज, रेल्वे, एसआरए, कलेक्टर, डिफेन्स, सार्वजनिक बांधकाम, एमआयडीसी यांच्याशी ही सेवा जोडली जाणार आहे. लवकरच टीडीआर ऑनलाइन करणार आहे, इमारतिंचा डाटा जीआयएस सोबत जोडला जाणार आहे, मोबाईल टेक्नोलोजीचा विचार केला जाणार आहे असल्याचे चिठोरे म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad