मुंबई / प्रतिनिधी 23 May 2016
पारंपरिक मच्छिमार सेवा समितीने अरबी समुद्रात उभारण्यात येत असलेल्या शिवस्मारकाला विरोध केला आहे. यासंबंधि अरबी समुद्रात शिवस्मारक ज्या ठिकाणी उभारले जाणार आहे, त्या ठिकाणी मच्छिमार आपल्या बोटींना काळे झेंडे लावून निषेध सागरी फेरी काढणार असल्याची माहिती समितीचे प्रमुख मार्गदर्शक रोहित पांडे यांनी दिली.
मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत पांडे बोलत होते. राज्य सरकार द्वारे मुंबईच्या अरबी समुद्रात भव्य शिवस्मारक उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. मात्र सरकारने मच्छिमारांना विश्वासात घेतलेले नाही. मच्छिमारांच्या अडचणीही न समजून घेता शिवस्मारकाची योजना आखण्यात आलेली आहे. शिवस्मारकामुळे मच्छिमारी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. यामुळेच स्मारकाला विरोध करण्यात आलेला आहे, असे पांडे यांनी सांगितले.
स्मारक उभारण्यासाठी निवडलेल्या जागेत शिण्ड, घोळ, कोता, रावस, बिल्जा, तारली, कोळंबी यासारख्या अनेक प्रकारची मासेमारी होते. स्मारकाच्या बांधणीसाठी मोठा भराव घातला जाणार आहे. यामुले मासेमारी व्यवसाय धोक्यात आला असताना पर्यावर्णाचेही नुकसान होणार आहे. यामुले येत्या 25 मे रोजी 200 मच्छीमार नौका काले झेंडे लावून निषेध करणार आहेत अशी माहिती पांडे यांनी दिली. याच वेळी मच्छीमारांसाठी कार्यरत असलेल्या सर्व संघटनानी एकत्र यावे असे आवाहन पांडे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment