मुंबईमधे 15 ते 20 मिनिटापेक्षा जास्त पाणी साचणार नाही - मुंबई महापालिकेचा दावा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 May 2016

मुंबईमधे 15 ते 20 मिनिटापेक्षा जास्त पाणी साचणार नाही - मुंबई महापालिकेचा दावा

मुंबई / प्रतिनिधी - मुंबईमधे एका तासात 50 मिलीमिटर पर्यंत पाउस पडला तरी मुंबईमधे 15 ते 20 मिनिट पेक्षा जास्त पाणि साचणार नाही असा दावा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी केला आहे. याच वेळी 50 मिलीमिटर पेक्षा जास्त पाउस पडला, समुद्रात 4 मिटर पेक्षा जास्त लाटा उसळल्या आणि त्याच वेळी पाउस पडत असला तर मात्र पाणी साचू शकते अशी शक्यता देशमुख यांनी वर्तवली आहे.

मुंबईमधे 565 किलोमिटरचे नाले आहेत. 174 पाणी निचरा करणारे मार्ग आहेत. त्यापैकी 44 समुद्र सपाटीखाली, 124 समुद्र सपाटीवर आणि फ़क्त 6 भरती रेषेच्यावर आहेत. मुंबईमधे आधी 1 तासात 25 मिलीमिटरपर्यन्त पाउस पडला तर पाणी निचरा करणारी व्यवस्था होती. आता 50 मिलीमिटर पर्यन्त पाउसाचे पाणी वाहून नेणारी यंत्रणा उभारण्यात आली आहे. मुंबईच्या भौगोलिक परिस्थितीमुले यापेक्षा मोठी पाणी वाहून नेणारी व्यवस्था उभारणे शक्य नसल्याचे देशमुख यांनी सांगितले.

मुंबईमधे 270 कमी प्रमाणात पाणी साचणारी ठिकाणे असून या ठिकाणी 293 पंप सज्ज ठेवण्यात आले आहेत. तर 40 ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते अशी ठिकाणे होती याठिकाणाची संख्या कमी करण्यास पालिकेला यश आले असून आता हिंदमाता, सायन रोड नंबर 24, नायर हॉस्पिटल गेट या तिन ठिकाणीच पाणी मोठ्या प्रमाणात साचु शकते परंतू 31 में रोजी ब्रिटानिया पम्पिंग स्टेशन सुरु झाल्यावर या ठिकाणच्या पाण्याचा निचरा लवकर करता येऊ शकते असा दावा देशमुख यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad