मुंबई, दि. 17 : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांना सुमारे 10 लाख वह्या, पेन, कंपासचे वाटप करण्यात येणार आहे.
जामनेर तालुक्यातील वसंतनगर, हरीनगर ही गावे इस्त्रायली कंपनीमार्फत दत्तक घेण्यात येणार असून 3 वर्षांमध्ये ती ‘आदर्श गाव’ म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. तालुक्यातील ज्या गावांमध्ये शौचालये नाहीत, त्या ठिकाणी एम्पथी फाउंडेशनतर्फे ती पुरविले जाणार आहेत. खानदेशातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांना सर्व प्रकारची मदत दिली जाणार असून वर्षभराचे धान्य, मुलांची शिक्षणाची सोय केली जाणार आहे. महाजन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बारावर्षीय कु. मरयम सिद्दीकी या मुलीने स्वत:च्या बचतीतून आणि मिळालेल्या बक्षीसाच्या रकमेतून दुष्काळग्रस्तांसाठी 21 हजार रुपयांचा धनादेश दिलेला आहे.
No comments:
Post a Comment