मुंबई / प्रतिनिधी - मुंबईचा सन 2014 - 2034 विकास नियोजन आरखडा मुंबई महानगरपालिकेकडून बनवला जात आहे. या विकास आराखड्यात गरीब व गरजू लोकांसाठी घरे बांधता यावीत म्हणून हरित, खार, पोर्ट ट्रस्ट इत्यादी जमीनीच्या आरक्षणात बदल केला जाणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त अजोय मेहता आणि विकास आरखड्यासाठीचे विशेष अधिकारी रामनाथ झा यांनी सांगितले.
मुंबईच्या विकास आरखड्याबाबत महापालिका आयुक्त अजोय मेहता आणि रामनाथ झा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मुंबईच्या 1 करोड़ 20 लाख लोकसंखेच्या प्रमाणात प्रत्तेक माणसी 37 चौरस मीटर जागा उपलब्ध आहे. प्रत्तेक माणसी जास्त जागा उपलब्ध व्हावी आणि मुंबईमधे परवडणारी घरे मोठ्या प्रमाणात उपलब्ध केली जाता यावीत म्हणून मिठागरे, पोर्ट ट्रस्ट, हरित पट्ट्यातील जमिनीवरील काही प्रमाणात आरक्षण बदलून घरे बांधली जाणार आहेत.
मुंबईची आर्थिक राजधानी म्हणून असलेली ओळख राहावी म्हणून मुंबईमधे आयटी आणि बायोटेक्नोलोजी पार्क उभारण्यासाठी तसेच स्वस्त्यातली हॉटेल उभारता यावीत म्हणून अतिरिक्त एफएसआय दिला जाणार आहे. 30 वर्षे जुन्या 35 हजार सोसयटयांच्या पुनर्बांधानी करता यावी म्हणून त्यांना उपलब्ध असलेल्या एफएसआय व्यतिरिक्त विकतचा फंजिबल एफएसआय दिला जाणार असल्याची माहिती झा यांनी दिली.
मुंबईची टाउन वेंडिंग कमिटी वेलोवेळी बदलत असते यापुढे आता विकास आराखडा बदलायची गरज राहणार नाही टाउन वेंडिंग कमिटी आरक्षणात बदल करू शकणार आहे. मुंबई महापालिका 10 लाख परवडणारी घरे बांधणार आहे या घरांचे नियोजन आणि वाटपासाठी नवा विभाग सुरु केला जाणार असल्याची माहिती आयुक्त अजोय मेहता यांनी दिली.
३२२ ते ६४५ चौफ़ुटांची घरे
मुंबईतील तीन हजार हेक्टरवर ३२२ ते ६४५ चौ़ फुटांची घरे बांधण्यात येणार आहेत़ अशा १० लाख घरांचा दर बांधकामांच्या दरावर निश्चित होणार आहे़, तर म्हाडाप्रमाणे लॉटरी काढूनच पालिका या सदनिकांचे वितरण करणार आहे़. शहराच्या विकास आराखड्यात येत्या काही वर्षांमध्ये मुंबईत १० लाख परवडणारी घरे बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे़ यासाठी ना विकास क्षेत्रातील २ हजार १०० हेक्टर जमीन मोकळी करण्यात आली आहे़ या जमिनी खासगी मालकांच्या असल्याने त्यासाठी पैसे मोजावे लागणार नाहीत़ त्यामुळे परवडणाऱ्या घरांच्या किमती निश्चित करताना जमीन खरेदी केल्याचा खर्च आकारण्यात येणार नाही़. बांधकामावर आलेल्या खर्चाच्या आधारेच या सदनिकांची किंमत निश्चित करण्यात येणार आहे़ त्यानुसार ३२२ ते ६४५ चौफ़ुटांची घरे बांधण्यात येणार आहेत़
No comments:
Post a Comment