दोषींवर कारवाई करा अन्यथा आम्हाला कायदा हातात घेवून कारवाई करावी लागेल - प्रकाश आंबेडकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 February 2016

दोषींवर कारवाई करा अन्यथा आम्हाला कायदा हातात घेवून कारवाई करावी लागेल - प्रकाश आंबेडकर

मुंबई / अजेयकुमार जाधव www.jpnnews.in
कायद्याची अंमलबजावणी करण्याचे काम सरकारचे आहे. रोहित वेमुला प्रकरणी सरकारने दोषीवर कारवाई करायला हवी. सरकारने कारवाई न केल्यास आम्हाला कायदा हातात घेवून कारवाई करावी लागेल असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. हैद्राबाद महाविद्यालयातील विद्यार्थी रोहितच्या वेमुलाच्या समर्थनार्थ मुंबईच्या राणी बाग भायखळा ते मंत्रालय असा मोर्चा काढण्यात आला यावेळी आंबेडकर बोलत होते. यावेळी मोर्चात आमदार कपिल पाटील, प्रकाश रेड्डी, माजी आमदार हरिदास भदे, फिरोज मिठीबोरवाला इत्यादी विविध पक्षाचे आणि संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

रोहित वेमुला याच्या आत्महत्ते नंतर देशभरात आंदोलने निदर्शने होत आहेत. अशी निदर्शने आणि मोर्चे विखुरलेली आहेत. यामुळे आंबेडकरी जनतेची ताकद दाखवण्यासाठी आणि रोहित वेमुला याच्या समर्थनार्थ हैद्राबाद आणि देशभरात होणाऱ्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी हा मोर्चा काढला असल्याचे आंबेडकर म्हणाले. सरकारने एफडीआय चे आंदोलन जसे चिरडले तसे हे आंदोलन चिरडू देणार नाही. नाक दाबले कि तोंड उघडते यामुळे मुंबईही देशाची आर्थिक राजधानी आहे. म्हणून मुंबईमध्ये मोर्चा काढून सरकारचे नाक दाबण्याचे काम करण्याची वेळ आमच्यावर येवू देवू नका असा इशारा आंबेडकर यांनी सरकारला दिला.

हैद्राबाद विद्यापीठातील कुलगुरूना त्वरित निलंबित करावे आणि दोषी व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी करताना हैद्राबाद विद्यापीठात कोणतीही दंगल झाली नव्हती. सुशीलला कोणीही मारले नव्हते असा तेथील पोलिसांचा अहवाल सांगत असताना केंद्रीय शिक्षण मंत्री स्मृती इराणी यांच्या पत्रामुळे प्रकरण चिघळले आणि रोहितवर अन्याय अत्याचार होऊन त्यातून रोहितला आत्महत्या करावी लागली. रोहितने केलेली हि आत्महत्या नसून हि हत्याच असल्याचा आरोप आंबेडकर यांनी यावेळी केला. 

आजचा मोर्चा पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अडवला गेला आहे. हा इशारा मोर्चा आहे. मोर्चामधील सहभागी तरुणांच्या गर्दीची नोंद घेवून सरकारने रोहितच्या आत्महत्तेला जबाबदार असलेल्यावर कारवाई करावी अन्यथा पुढच्या वेळी यापेक्षा तयारीनिशी मोर्चा काढून विधानभवन गाठू असे सरकारला ठणकावून सांगितले. ज्या लोक तुम्हाला खुर्चीवर बसवू शकतात तेच लोक तुम्हाला खुर्चीवरून उतरवू शकतात याचे भान ठेवण्याचे आवाहन सरकारल केले. हैद्राबाद मध्ये रोहितच्या समर्थनार्थ आंदोलन सुरु आहे या कमिटीने जर दिल्लीला धडक द्यायचा निर्णय घेतल्यास सर्वांनी दिल्लीला धडक देवून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केले. 

पोलिसांशी झटापटी आणि ठिय्या आंदोलन 
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आलेला हजारोंचा मोर्चा रोखण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असता कार्यकर्ते आणि पोलिसांत तीव्र झटापटी झाली. कार्यकर्त्यांनी पोलिसांचे कडे आणि ब्यारीकेट्स हटवून मंत्रालयाच्या दिशेने चाल करण्याचा प्रयत्न केला. परंतू हा मोर्चा इशारा मोर्चा असल्याने सर्वांनी रस्तावर बसावे असे आवाहन आयोजकांनी करताच रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. ठिय्या आंदोलनामुळे सिएसटी ते मेट्रो आणि भायखळा कडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. 

विद्रोही गाण्यांनी मोर्चाला आणला जोश
राणी बाग पासून निघालेला मोर्चा सीएसटी स्थानकासमोर पोलिसांनी अडवल्यावर विद्रोही गाण्यांनी आणखी सूर धरला. एकीकडे तरुणान मध्ये रोहितच्या आत्महत्तेमुळे असलेली संतप्त भावना आणि विद्रोही गाणी यामुळे मोर्चा मध्ये जोश भरला होता. 

Post Bottom Ad