मुंबई / जेपीएन न्यूज नेटवर्क www.jpnnews.in
महापालिकेच्या स्थायी समितीच्या अंदमान-निकोबार दौऱ्यात सहभागी झाल्याबद्दल शिक्षण समिती अध्यक्ष रितू तावडे यांना मुंबई भाजपने "कारणे दाखवा‘ नोटीस पाठवली आहे. महापौर स्नेहल आंबेकर यांच्यासह शिवसेनेचे स्थायी समिती सदस्य या दौऱ्यावर गेले होते. त्यात तावडेही सहभागी झाल्या होत्या; मात्र भाजपचे अन्य सदस्य या दौऱ्यापासून लांब राहिले. या दौऱ्यावरून सर्व पक्ष शिवसेनेला कोंडीत पकडणार असल्याची चिन्हे दिसताच भाजपने तावडे यांना नोटीस पाठवून पाठ सोडवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तावडे या दौऱ्यात पक्षाला न कळवता का सहभागी झाल्या, या दौऱ्यातून मुंबईसाठी काय मिळाले, पाठलाग करणाऱ्या काही वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींबाबत पोलिसांकडे तक्रार का नोंदवली या प्रश्नांची उत्तरे मुंबई भाजप अध्यक्ष ऍड. आशीष शेलार यांनी मागितली आहेत.