आ. धैर्यशिल पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली रविवार पासून शेतकऱ्यांच पेण ते वर्षा लाँग मार्च - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 February 2016

आ. धैर्यशिल पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली रविवार पासून शेतकऱ्यांच पेण ते वर्षा लाँग मार्च

मुंबई / JPN NEWS www.jpnnews.in
पेण तालुक्यातील हेटवणे धरणाचे पाणी पेण तालुक्याती वाशी - खारेपाट विभागातील टंचाईग्रस्त गावांना पाण्यासाठी मिळावे व त्याकरीताच्या योजनेसाठी 30 कोटी रूपये त्वरीत मंजूर करावेत, तसेच सिंचनाकरीता बांधण्यात आलेल्या या धरणाचे पाणी येथील शेतकऱ्यांना सिंचना करीता मिळावे या दोन प्रमुख मागण्यांसाठी, येत्या रविवारपासून पेण तालुक्यातील चार हजार शेतकऱ्यांचा  'पेण ते वर्षा बंगला' असा लाँग मार्च काढुन या प्रश्र्णी सरकारला जाग आणण्यात येईल असा इशारा आ.धैर्यशिल पाटील यांनी आज मुंबईत सरकारला दिला.

या संबंधी पत्रकारांना सविस्तर माहिती देली आ. पाटील यां सांगितले की पेण तालुक्यातील शेतकऱ्यानां पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळावे, यासाठी हेटवणे मध्यम सिंचन प्रकल्प 2000 साली पूर्ण केला. त्यासाठी तत्कालीन आ. भाई मोहन पाटील यांनी स्वता: आपली पाच गावे पाण्याखाली घातली. या पाच गावाच्या त्यागातून सर्व तालुक्याला मुबलक पाणी मिळेल, असा त्यांना विश्वास होता. सन 2003 - 2004 सालापर्यंत कालव्यांच्या कामांकरीता शासनाकडून आर्थिक तरतूद सूरळीतपणे चालू होती. त्यानंतर मात्र काम थंडावले. 2007 सालीतर शासनाने सेझ प्रकल्पासाठी सदर जमीन संपादीत करण्यात येत असल्याचे कारण पुढे करून कालव्यांची कामे थांबवण्याची लेखी सूचना पाटबंधारे खात्याला दिली, असे आमदार पाटील यांनी सांगितले.
  
ते पुढे म्हणाले की, आता सेझ रद्द झाला पण कालव्यांच्या कामासाठी सरकारने एका पैशाचीही तरतूद आजवर केली नाही. परिणामी या धरणातील एकूण साठ्यापैकी दहा ते पाणी सिडको करीता देण्यात येते. अपुऱ्या कालव्यांच्या कामामुळे केवळ शंभर ते दिडशे हेक्टर जमीन ओलिता खाली आली आहे. त्यामुळे वीस ते पंचवीस टक्केच पाणी या धरणाचे वापरले जाते आणि 75 ते 80 टक्के पाणी तसेच पडुन राहते. 
   
एकीकडे पेण तालुक्यातील शेतकरी पाण्यासाठी हवालदिल झाला असताना हेटवणे धरणाचे 80 टक्के पाणी सरकारच्या नियोजन शुन्यतेमुळे मात्र पडुन आहे. जलयुक्त शिवाराची सरकार घोषणा करते पण आमच्या आवारात असलेले पाणी आम्हालाच मिळत नाही हे शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे असेही  आमदार पाटील यांनी सागितले. या दोन्ही मागण्यासाठी 9 फेब्रुवारी 2013 तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी प्रचंड मोर्चा नेला. त्यावेळी या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. पण शेवटी ते अश्वासनच राहिले. असे आमदार धैर्यशील पाटील यांनी सांगीतले.
  
आज मेक इन इंडियाचा प्रचंड गाजावाजा होत असताना मुलभुत सुविधां करीता रस्त्यावर उतरावे लागते हे खेदजनक आहे. आमच्या समस्या मुळापासून सोडवाव्यात असे साकडे घेवून दि. 14/02/2013 पासून मुख्यमंत्री महोदयांकडे दाद मागण्याकरीता डोक्यावरती उताणी घागर घेवून हजारो माय-भगिनी व बंधूसह पायी पाणी संघर्ष यात्रेचे मार्गक्रमण करीत आहोत व या मागण्या पुर्ण होईपर्यंत मा. मुख्यमंत्री महोदयांच्या मुंबईतील वर्षा निवासस्थानावर ठिया आंदोलन करणार असे आ. धैर्यशिल पाटील यांनी पत्रकारांना सांगीतले.

Post Bottom Ad