राज्यातील कायदा व सुवराज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली; - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 February 2016

राज्यातील कायदा व सुवराज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली;

लातुर, इंदापुर घटने प्रकरणी आरोपावर कडक कारवाई करावी - धनंजय मुंडे्
MUMBAI http://www.jpnnews.in दि.23 Feb 2016
लातुर जिल्ह्यातील पानगांव येथे अल्पसंख्याक समाजाच्या पोलीस अधिकार्‍यास झालेली मारहाण आणि इंदापुर येथे दलित समाजातील माय-लेकींना निवस्त्र करून झडती घेणे या दोन्ही घटना म्हणजे राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे द्योतक असल्याची टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी केली आहे.

विधान भवनात पत्रकारांशी बोलतांना जनतेचे रक्षण करणारे पोलीसच या राज्यात असुरक्षीत ठरत असुन या प्रकरणातील पोलीसांची आपण भेट घेणार असुन अशा प्रकारे भगवा झेंडा हातात घेवुन दहशत निर्माण करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. अल्पसंख्याक असलेल्या आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्तींचे रक्षण करणार्‍या पोलीसांवर भगवे झेंडे घेवुन हल्ला करणारे खरोखरच शिवरायांचे अनुयायी आहेत का असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

अधिवेशनाचा काळावधी वाढवा ! राज्यातील प्रचंड दुष्काळ आणि विविध प्रश्‍नांवर चर्चा करावयाची असल्याने 9 मार्च पासुन सुरू होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन 13 एप्रिल ऐवजी एप्रिलच्या शेवटपर्यंत वाढवण्याची मागणी आपण आज झालेल्या  कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

मंत्र्याचे दुष्काळी दौरे हे उशिराचे शहाणपणअधिवेशनाच्या तोंडावर राज्यातील मंत्री दुष्काळी दौर्‍यावर जात असल्याच्या पार्श्‍वभुमीवर हे दौरे म्हणजे जनतेची दिशाभुल करण्याचा प्रयत्न असुन उशीरा सुचलेले शहानपण आहे. तीन महिन्यांपुर्वी असे दौरे केले असते तर आज दुष्काळात होरपळणार्‍या शेतकर्‍यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असता असे ही ना.मुंडे म्हणाले.

बाटलीबंद पाण्याचे प्रकल्प ताब्यात घ्या राज्यात एकीकडे पाणी टंचाई असतांना दुसरीकडे बाटली बंद पाण्याचा गोरख धंदे राजरोज चालु असुन पाण्याची अव्वाच्या सव्वा दराने विक्री करून जनतेची लुट करत आहेत. त्यामुळे हे बाटली बंद पाण्याचे प्रकल्प शासनाने ताब्यात घेवुन मोफत पाणी वितरण करावे अशी मागणी ही त्यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad