हार्बर रेल्वे विस्कळीत - चेंबूरला रेल रोको - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 February 2016

हार्बर रेल्वे विस्कळीत - चेंबूरला रेल रोको

मुंबई http://www.jpnnews.in दि. २२ - 
सातत्याने हार्बर रेल्वेवर होणारे बिघाड आणि सोमवारी सकाळीच सीएसटीजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे हार्बरमार्गावरील गाडया १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या यामुळे संतापलेल्या प्रवाश्यांनी चेंबूर रेल्वे स्थानकात रेल रोको केला. 

रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर सातत्याने बिघाड होत आहे. सातत्याने होणाऱ्या बिघाडामुळे रेल्वे सेवेवर परिणाम होऊन त्याचा फटका प्रवाश्यांना बसत आहे. हार्बर मार्गावर १२ डब्याच्या गाड्या चालवण्यासाठी ७२ तासांचा घेतलेला जम्बोब्लॉक संपताच सोमवारी सकाळी हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. सीएसटीजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे हार्बरमार्गावरील गाडया १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.  या बिघाडामुळे वाशी, पनवेल आणि अंधेरीच्या दिशेने जाणारी आणि येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन प्रवाशांच्या कामावर जायच्यावेळी हा तांत्रिक बिघाड उदभवल्याने नोकरदार प्रवाशांचे हाल होत झाले. मागच्या काही दिवसात हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक अनेकदा विस्कळीत झाली आहे याचा राग चेंबूर मधील प्रवाश्यांनी सोमवारी काढला. रेल्वेमार्गावर उतरत प्रवाश्यांनी चेंबूर स्थानकात लोकल थांबवून ठेवली होती. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad