मुंबई / JPN NEWS www.jpnnews.in
एकीकडे हेमा मालिनी सारख्या अभिनेत्रीला कवडीमोल दराने भूखंड दिला जातो आणि लक्ष्मण गायकवाड यांच्या सारख्या मराठी लेखकावर सरकार अन्याय का करत आहे असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.
सरकारने साहित्यिकांच्या पाठिशी उभे राहण्याची गरज असताना मागास, उपेक्षीत,भटक्या विमुक्त समाजातील एका साहित्यिकाला स्वतःला कोंडून घेण्याची वेळ येणे शासनासाठी लाजीरवाणी बाब असून न्यायालयाच्या निर्णयाचा पुर्ण आदर राखून गायकवाड यांच्या उदर्निवाहाची व्यवस्था करणे सरकारला शक्य नाही का ? असा सवाल यावेळी मुंडे यांनी केला. गायकवाड प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयाची जलदगतीने अमंलबजावणी करणाऱ्या सरकारने सिने दिग्दर्शक सुभाष घई यांना दिलेला भूखंड परत घेण्यातबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतरही कार्यवाही का होत नाही ? असा सवाल मुंडे यांनी केला.