वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान प्राणिसंग्रहालयातील सुशोभीकरणाला लवकरच सुरुवात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 February 2016

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान प्राणिसंग्रहालयातील सुशोभीकरणाला लवकरच सुरुवात

६३ बगिच्यांचा विकास करण्यासाठी पालिका १४ कोटी रुपये खर्च करणार 
मुंबई http://www.jpnnews.in 
गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्याना प्राणिसंग्रहालयाच्या सुशोभीकरणाला सुरुवात होणार आहे. याच्या पहिल्या टप्प्यात ६३ बगिच्यांचा विकास करण्यात येणार आहे. या बगिच्यांना कुंपण घालणे, पर्यटकांसाठी आसनव्यवस्था करणे, गवताची पटांगणे, लॅण्डस्केपिंग ही कामे करण्यात येणार असून त्यासाठी पालिका १४ कोटी रुपये खर्च करणार आहे. तसा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीकडे पाठवला आहे. 

भायखळ्यामध्ये २, १०, ४३७ चौ. मीटर क्षेत्रफळावर विस्तारलेल्या भव्य प्राणिसंग्रहालयात तब्बल ६३ छोटे छोटे बगिचे आहेत. लॅन्डस्केपिंक, बसण्याची व्यवस्था, दगडी पायवाट आदी कामे करण्यात येणार आहेत. प्राणिसंग्रहालयाचे हिरवेगारपण टिकवण्यासाठी त्यात लतामंडप बांधणे, लॅण्डस्केपिंगची कामे, गवताचे पटांगण, झाडे व झुडपे लावणे, पर्यटकांसाठी आसनव्यवस्था पुरवणे, उद्यानांभोवती कुंपण बांधणे, कुंड्यांमध्ये रोपटे लावणे आदी कामे करण्यात येणार आहेत. त्याकरिता मे. डी. बी. इन्फ्राटेक यांना कंत्राट देण्याचे पालिकेने ठरवले असून या कामासाठी पालिकेला १४ कोटी ९० लाखांचा खर्च येणार आहे.  

महापालिकेने 2006 मध्ये भायखळा प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरणाचा निर्णय घेतला होता. प्राणिसंग्रहालातील चित्ता कॅफे तत्कालीन आयुक्त सुबोध कुमार यांनी रद्द केले. त्यामुळे खर्च 433 वरून 325 कोटीरुपये झाला आहे. पेंग्विनच्या परिसरातच फाईव्ह डी थिएटर आणि अभ्यास केंद्र महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी रद्द केल्यामुळे त्याचा 106 कोटींचा खर्च 65 कोटींपर्यंत कमी झाला. प्राणिसंग्रहालयात पेंग्विन गॅलरीचे काम सुरू आहे. त्यासाठी 65 कोटींचा खर्च येईल. उद्यानाच्या अंतर्गत सुशोभीकरणासाठी 12 कोटी 31 लाख खर्च येणार आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण आणि वारसा जतन समितीने याला मंजुरी दिली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad