महापालिकेच्या मंडईतील गाळेधारकांना 'चेंज ऑफ बिझनेस'ची परवानगी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 February 2016

महापालिकेच्या मंडईतील गाळेधारकांना 'चेंज ऑफ बिझनेस'ची परवानगी

मुंबई http://www.jpnnews.in 
महापालिकेच्या मंडईमधील गाळेधारकांना यापुढे त्याच गाळ्यात राहून आपला व्यवसाय बदलणे शक्‍य होणार आहे. काळाच्या ओघात एखादा व्यवसाय चालत नसेल तर व्यवसायात बदल करण्याची (चेंज ऑफ बिझनेस) परवानगी देण्यास प्रशासनाने शनिवारी (ता. 20) तत्त्वतः मंजुरी दिली. 


महापालिकेच्या मंडईमध्ये अनेक गाळे विविध कारणास्तव बंद पडून आहेत. एखादा व्यवसाय चालत नाही म्हणून गाळे बंद ठेवण्याची पाळी अनेकदा गाळेधारकांवर येते. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्‍नांसंबंधी शिवसेनेच्या संजना मुणगेकर यांनी शनिवारी बाजार उद्यान समितीमध्ये आवाज उठवला. एखाद्या परिसरात एखादा व्यवसाय नाही चालत त्यामुळे अशा ठिकाणी त्या गाळेधारकाला दुसरा व्यवसाय करण्याची परवानगी दिली जात नव्हती. ज्या व्यवसायासाठी परवाना दिला आहे तोच व्यवसाय त्याला करावा लागत होता. मात्र कुर्ला येथील यादव मंडईमध्ये 22 पैकी फक्त आठ गाळेच सुरू असल्याचा दाखला त्यांनी या वेळी दिला. या परिसरात चिकनच्या तुलनेत मटणाच्या दुकानांना प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अनेक गाळेधारकांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे त्यांनी हे गाळे काही महिन्यांपासून बंद ठेवले होते. याबाबत मुणगेकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. या गाळेधारकांना त्याच गाळ्यात दुसरा व्यवसाय करण्याची परवानगी दिली तर पालिकेचा बुडणारा महसूलही वाढेल व गाळेधारकांना उदरनिर्वाहाचे साधनही मिळेल, असा मुद्दा मुणगेकर यांनी मांडला. त्यावर प्रशासनाने सकारात्मक उत्तर दिले असून त्यादृष्टीने कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad