प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये यासाठी मानवी साखळी करून प्रवाशांमध्ये जनजागृती
मुंबई / मुकेश धावडे / JPN NEWS www.jpnnews.in
वाढत्या रेल्वे अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी लोहमार्ग पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांच्या आदेशानुसार आज रेल्वेच्या पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर 'बी सेफ; चा संदेश देवून प्रवाशांमध्ये रेल्वे रूळ ओलांडू नका यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात आली याचाच एक भाग म्हणून वडाळा लोहमार्ग पोलिस ठाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद ढावरे यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळा गेट क्रमांक 4 येथे वडाळा लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे पोलिस मित्र एकवटले होते. प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये यासाठी मानवी साखळी करून प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात येत होती. यावेळी वडाळा जीआरपी अधिकारी व कर्मचारी वर्ग, रेल्वे पोलिस मित्र आणि नवी मुंबई रेल्वे प्रवासी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
रेल्वे रूळ ओलांडणे हा कायद्याने गुन्हा आहे हि सूचना केवळ रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या कानी पडते मात्र रेल्वे हद्दीतील रेल्वे रूळा लगतच्या झोपडपट्टीमध्ये कहिक ठिकाणी पादचारी पुल असो वा नसो तरीही रेल्वे रूळ ओलांडून जाणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. परिणामी यामुळे अपघात होऊन मरण पावणाऱ्यांची त्याचबरोबर जखमी होणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. वडाळा गेट क्रमांक 4 येथे देखील रेल्वे रूळ ओलांडून अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे यावर नियंत्रण आणण्यासाठी वडाळा जीआरपी च्या वतीने वडाळा गेट क्रमांक 4 येथे वडाळा लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे पोलिस मित्र एकवटले होते. प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये यासाठी मानवी साखळी करून प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात येत होती. त्याचबरोबर एखाद्या झोपडपट्टी लगत रेल्वे पादचारी पुल नसेल तरी त्यांनी रेल्वे रूळ ओलांडू नये तर वेळे आधी घरातून निघावे जेणे करून लांबचा मार्ग अवलंबून सुरक्षित रित्या रेल्वे स्थानकात प्रवाशांना पोहचता येईल. असा सल्ला प्रवाशांना देण्यात येत होता. तसेच जे प्रवासी रेल्वे रूळ ओलांडत होते त्यांना गांधीगिरी पद्धतीने पुष्प गुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात येत होते.