मुंबई / JPN NEWS www.jpnnews.in
दुचाकीचा चालक व त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीला यापुढे हेल्मेट वापरावे लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या 2003 मधील एका आदेशानुसार मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 129 नुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने हे आदेश जारी केले.
दुचाकी चालवण्यासाठी शिकाऊ परवाना देतानाच हेल्मेट वापरण्याबाबत हमी घेतली जाते. न्यायालयाच्या आदेशानुसार दुचाकी खरेदी करतानाच खरेदीदारास दोन हेल्मेट घ्यावी लागतील. वाहन नोंदणी अधिकाऱ्याने त्याच्याकडे सादर केलेल्या कागदपत्रांत वाहनासोबत दोन हेल्मेट पुरवण्यात आल्याची खातरजमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.