म्हाडाच्या घरांसाठी बुधवारी सोडत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 February 2016

म्हाडाच्या घरांसाठी बुधवारी सोडत

MUMBAI http://www.jpnnews.in दि. 22 Feb 2016 
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या वतीने बांधण्यात आलेल्या ४२७५ सदनिकासाठी येत्या बुधवारी (दि.२४) संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. म्हाडाने विरार-बोळींज, मीरा रोड, कावेसर-ठाणे , बाळकुम-ठाणे आणि वेंगुर्ला या ठिकाणी बांधलेल्या घरांसाठीची सोडत बुधवारी सकाळी दहा वाजता वांद्रे (प) येथील रंगशारदा नाट्यगृहात काढली जाणार आहे. या कार्यक्रमाचे वेबकास्टिंगही होईल. सोडतीच्या ठिकाणी अर्जदारांना ओळखपत्र व अर्जाची मूळ पावती दाखविल्यास प्रवेश दिला जाणार आहे. हा निकाल सायंकाळी सहा वाजता https://lottery.mhada.gov.in या साइटवर जाहीर होईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad