आता ईस्त्रायलमध्ये शिकविले जाणार मराठी भाषेचे धडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 February 2016

आता ईस्त्रायलमध्ये शिकविले जाणार मराठी भाषेचे धडे

मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत तेल-अविव विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार.
मुंबई / www.JPNnews.in दि.१५ फेब्रुवारी
मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार हा विदेशात व्हावा या उद्दीष्टाने मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून आज इस्त्रायलमधील तेल-अवीव या विद्यापीठाशी मराठी भाषा शिकविण्याचा अतिशय महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. विदेशात मराठी भाषेचा अभ्यासक्रम सुरु करण्याची ही बहुधा पहिलीच घटना असून नजीकच्या काळात अन्य देशांमध्येही मराठी भाषेसाठी सामंजस्य करार करण्यात येईल. जेणेकरून मराठी भाषेचा प्रसार जगभरात होईल असा विश्वास तावडे यांनी यावेळी व्यक्त केला.

ईस्त्रायलमधील तेलअविव विद्यापीठात  मराठी भाषा शिकविण्यासाठी आज तेलअविव विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, आणि राज्य मराठी विकास संस्था यामध्ये सामंजस्य करार पार पडला. मराठी भाषा भारताबाहेर अन्य देशांच्‍या विद्यापीठात शिकविण्याचा बहुधा हा पहिलाच प्रसंग असावा. ईस्त्रालयमध्ये मराठी भाषीक लोकांची वस्ती अधिक आहे. त्यामुळे तेलअविव या विद्यापीठात सामंजस्य करारामुळे मराठी भाषा शिकता येणार आहे. देश विदेशात मराठी भाषेचा प्रसार करणे हे या करारामागील प्रमुख उदिृष्ट आहे. या सामंजस्य कराराप्रसंगी मराठी भाषा मंत्री विनोद तावडे, तेलअविव विद्यापीठाचे उपाध्यक्ष प्रा.रानान रैन, ईस्त्रायलचे वाणिज्य दूत डेविड अकोव्ह, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.संजय देशमुख आणि राज्य मराठी विकास संस्थेचे आनंद काटीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
      
तेल-अवीव विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्यामधील झालेल्या सामंजस्य कराराची प्रमुख वैशिष्टये सांगताना तावडे म्हणाले की, अनिवासी भारतीय तसेच भारताबाहेर स्थायिक झालेले भारतीय वंशाच्या लोकांशी सांस्कृतिक वीण घट्ट करून त्यांचा उपयोग व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, कला इ. द्वारे परराष्ट्र संबंध मजबूत करण्याकडे केंद्रातील मोदी सरकारचा कल आहे. त्याला अनुसरूनच देशोदेशी स्थायिक झालेल्या मराठी भाषिक लोकांच्यात महाराष्ट्राची भाषा, कला, संस्कृती जिवंत रहावी यासाठी महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक तसेच मराठी भाषा विभाग आग्रही आहे. भारताबाहेर मराठी भाषिक लोकांची जिथे अधिक वस्ती आहे अशा ठिकाणच्या विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकण्याची सोय उपलब्ध केल्यास तेथील मातीत जन्मलेल्या मराठी पिढीची महाराष्ट्राशी असलेली आपली सांस्कृतिक नाळ तुटणार नाही असेही तावडे यांनी स्पष्ट केले.
नियतकालिक प्रसिद्ध होते, दरवर्षी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो, तसेच गाजलेल्या मराठी नाटकांचे प्रयोग तेथे आयोजित केले जातात. १९९६ साली जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन इस्रायलमध्ये केले गेले होते. असे असले तरी, इस्रायलच्या मातीत जन्मलेल्या या लोकांच्या पुढच्या पिढ्या मातृभाषा म्हणून हिब्रू बोलतात. इस्रायली विद्यापीठांत संस्कृत, हिंदी तसेच मल्याळम भाषा शिकण्याची सोय असली तरी मराठी शिकण्याची सोय आजवर उपलब्ध नाही असेही त्यांनी सांगितले.
आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर यादृष्टीने आम्ही प्रयत्न सुरु केले. तेल अवीव विद्यापीठाने  जे इस्रायलमधील सर्वात मोठे आणि जगातील आघाडीच्या १५० विद्यापीठांपैकी एक आहे. महाराष्ट्र शासनाच्या तसेच राज्यातील विद्यापीठांच्या मदतीने आपल्याकडे मराठीचा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली. देश-विदेशात मराठी भाषेचा प्रचार करणे हे राज्य मराठी विकास संस्थेच्या उद्दिष्टांपैकी एक असल्यामुळे संस्थेने मुंबई विद्यापीठ आणि तेल-अवीव विद्यापीठासह इस्रायलमध्ये प्रायोगिक तत्वावर १ महिन्याचा मराठी भाषेचा अभ्यास वर्ग उपलब्ध करून देण्याच्या प्रकल्पात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठ भाषेचा हा अभ्यासक्रम २०१६ पासून इस्त्रायलमध्ये सुरु करण्यात येईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अन्य देशांतील ज्या शहरांमध्ये मराठी भाषिकांची संख्या लक्षणीय आहे, तेथे अशा प्रकारचा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही तावडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad