मुंबई / JPN NEWS www.jpnnews.in
शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये आलेल्या निरुपम यांचे उत्तर भारतीय समुदायातले काम लक्षात घेता महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून त्यांना अध्यक्षपद देण्यात आले आहे. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मुंबई दौऱ्यात निरुपम यांना अभय मिळणार हे जवळपास निश्चित झाले होते. बाहेरून आलेल्या व्यक्तीला थेट अध्यक्षपद दिल्याने नाराज असलेल्या निष्ठावंत कॉंग्रेसजनांना या अभयामुळे धक्का बसला आहे. गांधी- नेहरू घराण्यावर झालेली टीका माफ करणे हा प्रकार आक्षेपार्ह आहे. मात्र, श्रेष्ठीनीच अशी भूमिका घेतल्यामुळे करणार तर काय, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जाते आहे. या नाराजांमध्ये कामत गटाच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.