कचऱ्यापासून वीजनिर्मितीबाबत सल्लागार नेमाण्याचा प्रस्ताव महापालिकेत मंजूर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 February 2016

कचऱ्यापासून वीजनिर्मितीबाबत सल्लागार नेमाण्याचा प्रस्ताव महापालिकेत मंजूर

मुंबई / JPN NEWS www.jpnnews.in
मुंबई  महानगरपालिका प्रशासनाने कचऱ्या पासून वीज निर्मिती करण्याचा निर्णय घेतला असून या प्रकल्पाकरिता सल्लागार नेमाण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या प्रस्तावाला विरोधकांकडून जोरदार विरोध करण्यात आला, मात्र सत्ताधारी शिवसेना - भाजपाने बहुमताने सदर प्रस्ताव मंजूर करण्याचा निर्णय घेतल. 
             
मुंबईतील कचऱ्याची  विल्हेवाट लावण्याचे प्रयत्नच एक भाग म्हणून कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा विचार प्रशासनाने केला.  या अनुषंगाने सदर प्रस्ताव कसा राबवावा याकरिता सल्लागार नियुक्त करण्याचा प्रस्ताव आज स्थायी समितीत आणण्यात आला. सदर सल्लागार म्हणून टाटा कन्सल्टिंग सर्विसे या कंपनीची नियुक्ती करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेतला गेला. या प्रस्तावाला विरोध करताना कचऱ्यापासून वीजनिर्मितीचे काम यापूर्वी कुठे झाले आहे का, सल्लागाराच्या अहवालावर कार्यवाही होणार आहे का, हे तंत्रज्ञान आणण्याचे कारण काय टाटा ने यापूर्वी एखादा असा प्रकल्प राबवला आहे का,असे प्रश्न विरोधकांकडून विचारण्यात आले. त्याचबरोबर विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी मुंबईकराच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा हा प्रयत्न असल्यालाचा अरोक करीत वीज निर्मिती प्रकल्पातून खरोखर वीज मिळणार आहे का, लखनौ तसेच हैद्राबाद असे प्रकल्प यशस्वी झाले नसताना हा प्रकल्प का राबविला जात आहे असा सवाल केला.
                
यावर सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प राबविण्यात काय चुकीची आहे. असा सवाल केला तर भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी पालिकेतील सर्व गटनेते शांघाय येथे  'वेस्ट टु एनर्जी ' प्रकल्प पाहायला गेल्याची आठवण करून देत विरोधकांना उघडे पाडले. दिल्लीतही असा प्रयोग राबविण्यात येत असून मुंबईत वीज निर्मितीचा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी 'टाईम बोन्ड' प्रोग्राम देण्याची मागणी केली.  

Post Bottom Ad