मुंबई / जेपीएन न्यूज नेटवर्क www.jpnnews.in
मुंबई महापालिका आणि अनुदानित अशा 110 शाळांमधील 225 विद्यार्थ्यांनी तयार केलेली तंबाखूविरोधी सनद सरकारला सादर करण्यात आली. सलाम बॉम्बे फाउंडेशनतर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त या शाळांमधील विद्यार्थ्यांची बाल परिषद ना. म. जोशी शाळेत नुकतीच झाली. या परिषदेत मुलांनी तंबाखूबंदीसाठी सनद तयार केली. परिषदेत विद्यार्थ्यांनी संपूर्ण तंबाखूबंदी आणि शाळांबाहेर तंबाखू विक्री करणाऱ्या दुकानांवर बंदी या विषयांवर भर दिला आहे. विद्यार्थ्यांनी कायद्यात काही सुधारणाही सुचवल्या आहेत. तंबाखूचे दुष्परिणाम, तंबाखूमुक्त शाळा, शाळांच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवरील बंदी याबाबत सरकारी अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.