मुंबई / अजेयकुमार जाधव / JPN NEWS www.jpnnews.in
बेस्ट कामगारांसाठी कार्यरत असलेल्या बेस्ट एमप्लोइज को. ऑप. क्रेडिट सोसायटी मधे 40 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. भ्रष्टाचार झाल्याचे आम्ही मुख्यमंत्री, सहकार मंत्री यांच्या निदर्शनास आणूनही राज्य सरकार, सहकार विभाग आणि पोलिसांनी दुर्लक्ष केले असा आरोप बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी केला आहे. सरकार कारवाईकड़े दुर्लक्ष केल्यानेच अखेर आम्हाला न्यायालायत धाव घेउन दोषी लोकांवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश मिळवावे लागले असे सामंत यांनी सांगितले.

बेस्ट एमप्लोइज को. ऑप. क्रेडिट सोसायटीवर शरद राव प्रणित संघटनेचे वर्चस्व आहे. सोसायटीच्या संचालक मंडळाने बहुसंख्य सभासदांचा विरोध असताना 40 कोटी रुपयांच्या प्रस्तावाना मंजूरी दिली आहे. या 40 कोटी रुपयांमधुन सोसायटीचे नवे मुख्य कार्यालय आणि विश्रामगृह उभारले जाणार आहे. 40 कोटी रुपये मंजूर करण्यासाठी जी सभा लावली होती ती सभा बेस्ट कामगारांनी उधळून लावली होती. तसेच अन्य एक बैठक गोरेगाव येथे आयोजित केली असता त्या विरोधातही कामगार एकवटल्याने ती सभाही झाली नाही. तरीही संचालक मंडळाने सभा झाल्याचे दाखवून 40 कोटी रूपयांचा निधी आणि आवश्यकता नसतानाही 44 कर्मचाऱ्याची भरती केली आहे.
या विरोधात आम्ही सहकार विभाग आणि पोलिस प्रशासनाकड़े तक्रार दाखल केली परंतू त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. याबाबत कारवाई करण्यास दुर्लक्ष केले जात असल्याने मुख्यमंत्री, सहकार मंत्री आणि राज्य मंत्री दादा भूसे यांच्या कड़े तक्रार दिली असता मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यानी पूर्ण दुर्लक्ष करून भ्रष्ट संचालक मंदाळाला वाचवण्याचा प्रयत्न केला. राज्य दादा भूसे आणि मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी या प्रकरणी चौकशी करण्यास सांगितले परंतू सहकार विभाग आणि पोलिस यांच्यावर दबाव असल्याने कारवाई झाली नसल्याचे सामंत म्हणाले.
में 2015 पासून भ्रष्टाचार झाल्याचे सांगूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने अखेर आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागली. न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत 11 एप्रिल पर्यंत तपास करून सोसायटीचे अध्यक्ष चव्हाण, सेक्रेटरी शांताराम शेनॉय, आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मोकाशी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचे आदेश कुलाबा पोलिसांना दिले असल्याची माहिती सामंत यांनी दिली. सुहास सामंत यांच्यासोबत सुनील गणाचार्य, अनिल कोकीळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.