मुंबईकरांवर कोणताही अतिरिक्त कर न लावणारा ३७ हजार कोटीचा अर्थसंकल्प सादर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 February 2016

मुंबईकरांवर कोणताही अतिरिक्त कर न लावणारा ३७ हजार कोटीचा अर्थसंकल्प सादर

> नागरिकांना राईट टू सर्व्हिस मुळे ऑनलाईन सेवा 
> मालमत्ता व जलदेयकांची बँकांमधून बिले भरण्याची सुविधा 
> भांडवली खर्च भागविण्यासाठी दीर्घ मुदतीच्या विशेष निधीमधून ५५०९.७२ कोटी काढणार 
मुंबई / अजेयकुमार जाधव / जेपीएन न्यूज नेटवर्क www.jpnnews.in
मुंबई महानगरपालिकेच्या २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुका डोळ्या समोर ठेवून मुंबईकरांवर कोणताही अतिरिक्त कर न लावणारा अर्थसंकल्प बुधवारी सादर करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेचा सन २०१६ - १७ चा ३७ हजार ५२ कोटी रुपयांचा आणि ४ कोटी ६६ लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आयुक्त अजोय मेहता यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांच्याकडे सादर केला. सन २०१६ - १७चे अर्थसंकल्पीय आकारमान ३७०५२.१५ कोटी असून ते सन२०१५ - १६च्या सुधारित अर्थसंकल्पीय अंदाजाच्या तुलनेत ३९.९३ टक्क्यांनी जास्त आहे. सन २०१६ - १७च्या भांडवली खर्चाचे अंदाज १२८७४.७८ कोटी इतके असून ते चालू वर्षाच्या भांडवली अंदाजापेक्षा ८.५२ टक्क्यांनी जास्त आहे. सन २०१६ - १७ करिता महसुली उत्पन्नाचे अंदाज २५६४२.८८ कोटी असून महसुली खर्चाचे अंदाज २४१७२.७१ कोटी इतके असल्याचे मेहता यांनी सांगितले. 


मुंबई महानगरपालिकेला जकातीमधून ७९०० कोटी ऐवजी ६६५० कोटी,नियोजन खात्याच्या फंजीबल एफएसआय, पायाभूत सुविधा आकार आणि विकास नियंत्रण नियमावली मधून ५८२३.८२ कोटी पैकी ४७३२.४४ कोटी, इतकेच उत्पन्न मिळाले आहे. यामुळे सन २०१६ - १७च्या अर्थसंकल्पीय अंदाजात ७ हजार कोटी रुपये इतके जकातीचे ढोबळ उतपन्न अंदाजीले आहे. राज्य सरकारने एफएसआय मध्ये ०.३३ टक्क्याहून ०.५० इतकी वाढ केली आहे. अतिरिक्त ०.५० एफएसआय देण्यासाठी महापालिका, राज्य शासन चालू वर्षाच्या रेडी रेकणर दराप्रमाणे अधिमुल्य वसूल करणार असल्याने महापालिकेच्या उत्पन्नात यामुळे भर पडणार आहे. २०१६-१७ साठी १०३०३.४७ कोटी इतका भांडवली खर्च अंदाजला असल्याने हा खर्च भागविण्यासाठी दीर्घ मुदतीच्या आर्थिक धोरणाशी सुसंगत अशा निर्माण केलेल्या विशेष निधीमधून ५५०९.७२ कोटी इतकी रक्कम काढण्यात येईल असे मेहता यांनी सांगितले. 

महापालिकेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करून कर्मचारी आणि अभियंते यांच्या कौशल्यात वाढ करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाणार आहे, त्यासाठी ४ कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. महापलिका कर्मचाऱ्यांना आधार कार्ड क्रमांकावर आधारित बायोम्याट्रीक हजेरी पद्धत लागू केली जाणार आहे त्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करून दिली जाणार आहे. राईट टू सर्व्हिस कायद्याप्रमाणे १४ सेवा अधिसूचित करण्यात आल्या असून त्या पैकी १२ सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. २०१६ - १७ मध्ये मध्ये या सर्व सेवा ऑनलाईन करण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया वेगावन केली जाणार आहे. मालमत्ता व जलदेयकांची बँकांमधून बिले भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. कंत्राटातील फेरफारांचे नियमन करण्यासाठी नवीन धोरण आणून शिस्त लावली जाणार असल्याचे मेहता यांनी सांगितले. 

अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी महापालिका अधिनियम १५२ ए समाविष्ट करून अनधिकृत बांधकामावर प्रतिवर्ष मालमत्ता कराच्या २०० टक्के दंड लावण्याची तरतूद करण्यात आली आहे. झोपडपट्टी व्यतिरिक्त मालमत्तांचे ३६० डिग्री लीडार सर्वे द्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे त्यासाठी १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कर दात्यांना आगाऊ कर भरण्यास आकर्षित व उद्युक्त करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. चालू वर्षीही 'अर्ली बर्ड इंसेन्टीव्ह' देण्यात येणार आहे त्यासाठी ९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इथेनॉलवरील जकात रद्द करण्यात आली आहे. कच्या तेलावरील जकातीमध्ये ६०० कोटी इतकी घट झाल्याने कच्या तेलावरील जकात ३ टक्क्याहून ४. ५ टक्के इतकी करण्यात आली आहे. यामुळे पालिकेला ५०० कोटी रुपये इतका अतिरिक्त महसूल मिळेल अशी अपेक्षा मेहता यांनी व्यक्त केली आहे. 

१२५ वी डॉ. आंबेडकर जयंती, महापरीनिर्वाण दिनासाठी भरघोस तरतूद 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करण्यासाठी अर्थसंकल्पात १ कोटी रुपयांची विशेष तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. या तरतुदीतून बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित "कॉफी टेबल बुक" या पुस्तकाचे प्रकाशन आणि इतर उपक्रमाकरिता विनियोग केला जाणार आहे. २०१५- १६ च्या अर्थसंकल्पीय अंदाजातील १.५० कोटी रुपयांच्या तुलनेत सन २०१६ - १७च्या अर्थसंकल्पात महापरीनिर्वाण दिना करिता २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे आयुक्त मेहता यांनी सांगितले. 

अर्थसंकल्पात तरतूद
शहरी गरिबांना सेवा पुरवण्यासाठी ९१८७.९५ कोटी
विकास नियोजन    ६२८४.७१ कोटी
माहिती तंत्रज्ञान विभाग ३२३.५६ कोटी
रस्ते व वाहतूक ४५५४.४७ कोटी
पूल बांधण्यासाठी ६२९.३३ कोटी
पर्जन्य जलवाहिन्या १४०८.४८ कोटी
बिमर-टोवॅड प्रकल्पासाठी - २३३.१३ कोटी
आरोग्य व वैद्यकीय सेवा ३६९३.७४ कोटी
शिक्षण विभाग २३९४.१० कोटी
घन कचरा व्यवस्थापन २५१२.२२ कोटी
उद्याने ५००.२३ कोटी
अग्निशमन दल ५८१.५८ कोटी
मंड्या १४५.२३ कोटी
देवनार पशुवधगृह १३७.९५ कोटी
पाणी पुरवठा २६६२.०७ कोटी
मलनिस्सारण २२५.३५ कोटी
ररत्यांवरील एलईडी दिव्यांसाठी  - १० कोटी
सागरी किनारा रर-ता प्रकल्पासाठी - १००० कोटी
आश्रय योजनेसाठी  - ६७.०५ कोटी
इमारत परिरक्षणासाठी  - ६८० कोटी
देवनार पशुवधगृहासाठी - १३७.९५ कोटी
जेष्ठ नागरिक उपक्रमासाठी  - २५ लाख
अपंग महिलांच्या र-वयंरोजगारसाठी  - ३ कोटी
र-वयं रोजगार  योजनेसाठी - ३.५६ कोटी
बेस्ट उपक्रमासाठी - १० कोटी
गारगाई पिंजाळ प्रकल्प भुसंपादन - ८० लाख
भांडुप संकुल येथे 14 मेगाव्याट सौर ऊर्जा - ८ कोटी
वरळी भांडुप टेकडी जलाशय बांधनी - ११.५० कोटी
स्मार्ट सिटीमधे समावेश करावा म्हणून - १० कोटी 
गोरेगांव मुलुंड लिंक रोड प्रकल्पासाठी - १३० कोटी
घाटकोपर - मानखुर्द लिंक रोडसाठी - ८१ कोटी
नवीन पादचारी पूल व पूल - ९ कोटी
उड्डाणपूलसाठी  - ५ कोटी
रेल्वे उड्डाणपूलसाठी  - १० कोटी
विक्रोळी रेल्वे उड्डाणपूलसाठी - १४ कोटी 


Post Bottom Ad