शिवाजी महाराज मॅनेजमेंट गुरु - पुढील वर्षापासून चौथीच्या पुस्तकात धडा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 February 2016

शिवाजी महाराज मॅनेजमेंट गुरु - पुढील वर्षापासून चौथीच्या पुस्तकात धडा

मुंबई http://www.jpnnews.in 
शिवाजी महाराज हे सर्वोत्तम कुशल प्रशासक (मॅनेजमेंट गुरु) अशी ओळख सांगणारा शिवाजी महाराजांवरील धडा पुढील शैक्षणिक वर्षापासून चौथीच्या पुस्तकात समाविष्ट केला जाईल. हा धडा आठ पानांचा असेल. शिवाजी महाराजांचे शौर्य आणि पराक्रम हा सर्वांना माहित आहे. परंतू शिवाजी महाराज हे कुशल प्रशासक होते, याची ओळखही विद्यार्थ्यांना या धड्यातून होईल, अशी घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज केली.


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात शिवछत्रपतींच्या प्रतिमेस अभिवादन केल्यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना, श्री. विनोद तावडे म्हणाले की, शिवाजी महाराज हे पराक्रमी योध्दे होते, त्यांचा पराक्रम हा चौथीच्या पुस्तकात शिकविला जात आहे. या पराक्रमा बरोबरच शिवाजी महाराज यांच्या काळात जलसंधारण, जलसंवर्धन, पर्यावरण, शब्दकोष आणि शिवकालीन तलाव यांची विशेष व्यवस्था होते. पाणी आडवा पाणी जिरवा हा उपक्रम शिवाजी महाराजांनी आपल्या काळात राबविला. त्याचबरोबर दुष्काळ निवारण्याची यंत्रणाही त्यांच्या काळात  महाराजांनी राबविली. शौर्या बरोबरच शिवाजी महाराज हे कुशल प्रशासकही (मॅनेजमेंट गुरु) होते, हा इतिहास सुध्दा शाळेच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या उदिृष्टाने पुढील शैक्षणिक वर्षापासून पुस्तकात तो धडा समाविष्ट करण्यात येईल असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad