औरंगाबादला मंत्रीमंडळ बैठक घेण्याच्या घोषणेचा मुख्यमंत्र्यांना विसर. - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 February 2016

औरंगाबादला मंत्रीमंडळ बैठक घेण्याच्या घोषणेचा मुख्यमंत्र्यांना विसर.

मुंबई / JPN NEWS www.jpnnews.in
‘मेक इन इंडिया’ व ‘मेक इन महाराष्ट्र’ मध्ये व्यस्त असलेल्या सरकारला राज्यातील दुष्काळाक़डे लक्ष देण्यास वेळ नसून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथे मंत्रीमंडळ बैठक घेण्याच्या घोषणेचाही मुख्यमंत्र्यांना विसर पडला असल्याचा आरोप करुन मेक इन इंडियासाठी महाराष्ट्रात येणाऱ्या पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांनी दुसरी बाजू असलेला ‘फार्मर्स डेथ इन महाराष्ट्र’ देखील दाखवावा असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे.

मुंबई येथे राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदे त बोलताना मुंडे म्हणाले की 18 जून 2015 रोजी मुख्यंमत्र्यानी 1 महिन्याच्या आत औंरगाबाद येथे बैठक घेऊ असे जाहीर केले होते.आठ महिने होऊन देखील ही बैठक झालेली नाही. मराठवाड्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती असून शेतकरी आत्महत्यांवाढत आहेत.चारा-पाण्याअभावी जनावरांचे हाल होत आहे. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न बनला आहे. एका ही शहराला आणि ग्रामीण भागात  पाणी मिळत नाही. पाण्या अभावी रुग्णालायातील शस्त्र क्रिया बंद पडल्या आहेत.एकीकडे पाणी टंचाई असताना दुसरीकडे बाटलीबंद मिनरल वॉटरचे धंदे तेजीत असून गावा-गावांत पिण्याच्या पाण्यासाठी जनतेची लूट केली जात आहे. या पाणी माफियांवर नियंत्रण आणावे तसेच गरज पडल्यास हे प्रकल्प ताब्यात घेऊन जनतेसाठी खुले करावे अशी मागणी यावेळी त्यांनी केली. राज्यातील शेतकऱी आत्महत्यांबाबत राज्य सरकार गंभीर नसून  न्यायालयात खोटी शपथपत्रे सादर करुन राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या लपविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनीकेला

Post Bottom Ad