स्वच्छ शहरात भारताची आर्थिक राजधानी दहाव्या क्रमांकावर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 February 2016

स्वच्छ शहरात भारताची आर्थिक राजधानी दहाव्या क्रमांकावर

मुंबई / अजेयकुमार जाधव www.JPNnews.in 
केंद्रीय शहर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्वच्छ सर्वैक्षण पुरस्कारांची घोषणा केली यात कर्नाटकातील म्हैसूर शहराने पहिला क्रमांक पटकावला असून भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई स्वच्छ शहरांच्या यादीत 10 व्या स्थानावर आली आहे. मागील वर्षी मुंबई महानगरपालिका 147 व्या क्रमांकावर होती. मोठ्या महापालिकामधे मुंबईने पहिला क्रमांक पटकावला आहे.

केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान राबवले होते. या अभियानानुसार 73 शहरांनी भाग घेतला होता. केंद्र सरकारने या सर्वेक्षणाबाबत नुकताच निकाल जाहिर केला आहे. या निकाला नुसार भारतामधील सर्वात मोठा अर्थसंकल्प असणारी आणि जागतिक केंद्र असलेली मुंबई महानगरपालिका टॉप टेन मधे शेवटच्या म्हणजेच दहाव्यानंबर आली आहे.

व्यंकय्या नायडू यांनी जाहिर केलेल्या निकालामधे दुसऱ्या क्रमांकावर पंजाबमधील चंदीगड, तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली, चौथ्या क्रमांकावर नवी दिल्ली, पाचव्या क्रमांकावर आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणम, सहाव्या क्रमांकावर गुजरात मधील सुरत, सातव्या क्रमांकावर गुजरातमधील राजकोट, आठव्या क्रमांकावर सिक्कीममधील गंगटोक, नवव्या क्रमांकावर महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड तर दहाव्या क्रमांकावर मुंबई आहे.


मोदिंची वाराणसी सर्वात घाण्यारडया शहरातस्वच्छ भारत अभियान सुरु करणारे भारताचे प्रधानमंत्री ज्या संसदीय क्षेत्रातून निवडून आले त्या वाराणसी शहराचा सर्वात घाण्यारडया शहराच्या यादीत नववा क्रमांक आला आहे. यामुले देशाला स्वच्छतेचे धड़े देणाऱ्या मोदी यांच्या संसदीय क्षेत्रातच स्वच्छता अभियानाचा फज्जा उड़ाल्याचे सिद्ध होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad