महापालिकेच्या नायर रुग्णालयात नवीन 'कॅथ लॅब' कार्यरत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 February 2016

महापालिकेच्या नायर रुग्णालयात नवीन 'कॅथ लॅब' कार्यरत

ऍन्जिओप्लास्टी, स्टेंटींग, व्हॅाल्वोटॉमीज यासारख्या प्रक्रिया अद्ययावत पध्दतीने शक्य
मुंबई http://www.jpnnews.in
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या "बाई यमुनाबाई लक्ष्मणराव नायर धर्मदाय रुग्णालय व टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय" येथील हृदयरोग विभागामध्ये नविन 'कॅथ लॅब' '(Cardiac Catheterization Laboratory) नुकतीच कार्यान्वित करण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या या 'कॅथ लॅब' मुळे दररोज सुमारे २० हृदयरुग्णांना दिलासा मिळू शकणार आहे. या अद्ययावत 'कॅथ लॅब' द्वारे ऍन्जिओप्लास्टी, स्टेंटींग, व्हॅाल्वोटॉमीज व पेसमेकर बसविणे या प्रकारच्या प्रक्रियांवर आधारित उपचार हृदयरुग्णांवर करणे शक्य होणार आहे, अशी माहिती नायर रुग्णालयाच्या हृदयरोग विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अजय चौरसिया यांनी दिली आहे.


नायर रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या 'कॅथ लॅब' मुळे अधोरेखित झाले आहे. हृदयरुग्णांवर विविध उपचार करण्यासाठी 'कॅथ लॅब' हे अत्यंत महत्त्वाचे उपकरण मानले जाते. नायर रुग्णालयात नव्यानेच बसविण्यात आलेली 'कॅथ लॅब' ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाने व संगणकीय सुविधेसह सुसज्ज आहे. नायर रुग्णालयातील हृदयरोग विभागात दररोज सुमारे २५० रुग्णांवर उपचार केले जातात. यामध्ये बाह्यरुग्ण, आंतरुग्ण आदींचा समावेश आहे. नव्याने बसवण्यात आलेले 'कॅथ लॅब' पूर्णपणे संगणकीय पध्दतीने कार्य करते

हृदयातील अंतर्गत भागातील रचनेची प्रतिमा संगणकावर सुस्पष्ट येण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचे औषध हृदयात विशिष्ट पध्दतीने व विशिष्ट प्रमाणात सोडावे लागते. जुन्या 'कॅथ लॅब' च्या तुलनेत नवीन 'कॅथ लॅब' द्वारे रुग्णांवर उपचार करित असतांना सदर औषध तुलनेने कमी प्रमाणात सोडले तरी संगणकीय प्रतिमा अत्यंत सुस्पष्ट येते. नवजात शिशुंवर हृदयरोग विषयक उपचार करण्यासाठी या 'कॅथ लॅब' मध्ये विशेष सुविधा आहे. या 'कॅथ लॅब' मध्ये अत्याधुनिक 'द रोटाब्लेटर' (The Rotablator) असल्यामुळे अत्यंत सुनिश्चित पध्दतीने हृदयातील वाहिन्यांवर साचलेला थर (Plaque) काढणे शक्य होणार आहे.

या 'कॅथ लॅब' मध्ये १०० किलोवॅटचे जनित्र (Generator) समाविष्ट असल्यामुळे तसेच १८४µm (मायक्रोमीटर) 'फ्लॅट पॅनल तंत्रज्ञानाचा' अवलंब केला असल्याने अत्यंत सुस्पष्ट प्रतिमा प्राप्त करणे शक्य होणार आहे. या मशीनचा वापर करण्यासाठी वैद्यकीय विषयक अद्ययावत 'संगणकीय सॉफ्टवेअर' वापरण्यात येत असल्याने वैदयकीय विश्लेषण व संबंधित कार्यवाही अधिक अचूक व गतीशील करणे शक्य होणार आहे. ६० इंच आकाराची व ८ मेगा पिक्सल रिझोल्यूशन असणारी अत्याधुनिक 'डिस्प्ले स्क्रीन' हे देखील या ह्या 'कॅथ लॅब' चे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad