मुंबई ( प्रतिनिधी ) - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात यंदा झालेल्या कमी पावसामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे त्यामुळे मुंबई समोर अद्याप पाणी कपातीचे संकट कायम असून सद्या मुंबईकरांवर 20 टक्के पाणी कपात लागू आहे मात्र राज्य सरकारने भातसा धरणांमधील पाणी न दिल्यास मुंबईकरांच्या पाणी कपातीमध्ये वाढ होईल अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी दिली त्यामुळे मुंबईकरांचे लक्ष राज्य सरकारकडे लागले आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पाणी साठा बराचसा कमी आहे पाऊस समाधानकारक पडला नाही त्यामुळे यंदा मुंबईसमोर गंभीर पाणी संकट उभे आहे त्यामुळे मुंबईकरांना वर्षभर पाणी पुरवठा व्हावा यासाठी पालिकेने 26 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीपासून शहरात 20 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. या पाणी कपातीत वाढ होइल असे मुखर्जी यांनी सांगितले