शिवसेनेच्या जिव्हाळ्याच्या प्रकल्पांना आर्थिक तरतूद करत महापालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समितीत मंजूर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 February 2016

शिवसेनेच्या जिव्हाळ्याच्या प्रकल्पांना आर्थिक तरतूद करत महापालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समितीत मंजूर

MUMBAI http://www.jpnnews.in दि. 22 Feb 2016 
मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असताना शिवसेनेच्या जिव्हाळ्याचे प्रकल्प अर्थसंकल्पात उपेक्षीत राहिले आणि भाजपाच्या प्रकल्पांना अर्थसंकल्पात भरीव तरतुदी झाली. महापालिकेत जास्त नगरसेवक असतानाही आपल्या प्रकल्पांना अर्थसंकल्पात स्थान मिळाले नसल्याने शिवसेनेच्या प्रकल्पांसाठी आर्थिक तरतुदी करत स्थायी समितीने सन २०१६ - १७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीत मंजुरी दिली आहे. 

सन २०१६ - १७ चा ३७ हजार ५२ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात स्थायी समितीने ५00 कोटींचे अतिरिक्त तरतूद केल्याने मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आता ३७ हजार ५५२ कोटी रुपयांचा झाला आहे. स्थायी समितीने ५०० कोटींची सुधारणा करताना बेस्टसाठी १०० कोटींची तरतूद केली आहे. आयुक्तांनी केवळ १० कोटी रुपये देऊन बेस्टची बोळवण केली होती. मात्र शिवसेनेने ही तरतूद ९० कोटीनी वाढवून १०० कोटी केली आहे. या १०० कोटींपैकी ९० कोटी भांडवली खर्चासाठी वापरता येणार असून १० कोटी बॅटरीवर चालणार्‍या बसेस खरेदी करण्यासाठी देण्यात आले आहेत. या बसेसचा फोर्ट फेरीसारखा वापर करण्यात येणार आहे. महानगर पालिकेतील नगरसेवकांना विकास निधी म्हणून २३२ कोटी निधी देण्यात येणार असल्याचे फणसे म्हणाले.  

अतिरिक्त ५०० कोटी रुपयांच्या तरतुदीमध्ये माथाडी भवनसाठी दोन कोटी, धारावीत संत रोहिदास भवन उभारण्यासाठी पाच लाख,संयुक्त महाराष्ट्र जयंतीसाठी सहा लाख, मराठी भाषा प्रशिक्षण वर्गासाठी १० लाख, डबेवाला भवनसाठी दोन कोटी,भूमिपुत्रांना स्वयंरोजगार केंद्र उभारण्यासाठी ५० लाख, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पीएच.डी करणार्‍यांसाठी एक लाख, मराठी नाट्य आणि साहित्यसंमेलनासाठी २५ लाख, भागोजी कीर स्मारकासाठी एक लाख, प्रभादेवीत आगरी भवन उभारण्यासाठी पाच लाख, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्यासाठी एक लाख, वर्सोवा येथे कोळी भवन उभारण्यासाठी पाच लाख, स्त्री आरोग्य देखभाल केंद्र उभारण्यासाठी १० लाख,क्रिकेट आणि फुटबॉल अकादमी उभारण्यासाठी पाच लाख मराठी साहित्य भवनासाठी पाच लाख लोककला व खाद्यसंस्कृतीच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र भवन उभारण्याकरिता पाच लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील स्मृतिस्थळाच्या आजूबाजूच्या परिसराच्या सुशोभीकरणाची तरतूद वाढवण्यात आली आहे. आता ही तरतूद १ कोटी ९० लाख करण्यात आली आहे तर रेसकोर्सवर थीमपार्क उभारण्यासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नाट्य संग्रहालयासाठी सुधारित विकास आराखड्यात जागा आरक्षित करण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना देण्यात आले आहे, अशी माहिती सभागृह नेत्या तृष्णा विश्‍वासराव यांनी दिली. महापालिकेने पहिल्यांदाच पत्रकार कल्याण निधीची स्थापना केली असून त्याकरिताही एक कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad