मुंबई / JPN NEWS www.jpnnews.in – दि.11 फेब्रुवारी.
भाजपा नेत्या खासदार आणि सिने अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या नाट्य विहार कला केंद्र चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेस मौजे.आंबिवली,अंधेरी येथे सवलतीच्या दरात देण्यात आलेला भूखंड हा बेकायदेशीर रित्या वाटप करण्यात आला असल्याने तसेच या संस्थेस वर्सोवा येथे देण्यात आलेल्या मुळ भूखंडावर त्यांनी तिवरांची व कांदलवनाची बेकायदेशीर कत्तल करुन सीआरझेड मधील नियमाचे उल्लघंन केल्याने अंधेरी येथील सदर भूखंड वाटप रद्द करावा तसेच सीआरझेड उल्लंघन केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे