मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी इथेनॉलवरील जकात रद्द - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 February 2016

मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी इथेनॉलवरील जकात रद्द

प्रस्ताव स्थायी समिती समोर सादर 
मुंबई http://www.jpnnews.in मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी इथेनॉलचा वापर आवश्यक असल्याने इथेनॉलवरील जकात रद्द करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. तसा प्रस्ताव आयुक्त अजोय मेहता यांनी स्थायी समिती समोर ठेवला आहे. 

वाहनांच्या धुरामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारने इंधनात दहा टक्के इथेनॉल वापरण्याचा आदेश दिला आहे. इथेनॉलवर सात टक्के जकात लावली जात असल्याने इथेनॉलचा पुरेसा पुरवठा मुंबईत होत नव्हता. जानेवारीत केद्र सरकारच्या वित्त विभागाच्या बैठकीत 
इथेनॉलवरील जकात रद्द करण्याची सूचना केली होती. वर्षभरात महापालिकेला इथेनॉलच्या जकातीतून फक्त 15 लाख 68 हजार इतकेच उत्पन्न मिळाले होते. इतक्या कमी उत्पन्नापेक्षा पर्यावरण वाचवण्यासाठी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी पुढाकार घ्यायचे ठरवले आहे. यामुळे अजोय मेहता यांनी अर्थसंकल्पात इथेनॉलवरील जकात रद्द करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार इथेनॉलवरील जकात रद्द करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad