नालेसफाईची व्हिडीओ शूटिंग होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 February 2016

नालेसफाईची व्हिडीओ शूटिंग होणार

MUMBAI http://www.jpnnews.in दि. 22 Feb 2016 
नालेसफाईत होत असलेल्या घोटाळ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी या कामावर सीसीटीव्हीमार्फत लक्ष ठेवण्याचे आश्‍वासन पालिका आयुक्तांनी दिले होते. मात्र, प्रशासनाने निविदांमध्ये सीसी टीव्हीची अटच समाविष्ट न केल्याने या वर्षी नालेसफाईचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. 

सफाईच्या कामावर नजर ठेवण्यासाठी प्रत्येक नाल्याच्या ठिकाणी सीसी टीव्ही लावण्याचे आश्‍वासन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले होते. मात्र, प्रत्यक्षात निविदा काढताना सीसी टीव्ही लावण्याची अटच समाविष्ट केलेली नाही. यामुळे नाल्यांच्या सफाईच्या ठिकाणी सीसी टीव्ही लावायचे झाल्यास त्यासाठी 86 कोटी रुपये अतिरिक्त खर्च येणार आहे. त्यावर तोडगा म्हणून व्हिडीओ शूटिंग करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसे निवेदन स्थायी समितीत मांडले आहे. या वेळी निविदा प्रक्रियेत अट समाविष्ट नसल्याने सीसी टीव्ही बसवता आले नाहीत. मात्र, पुढील वेळी ही अट समाविष्ट करण्यात येईल, असे स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी सांगितले. मागील वर्षी नालेसफाईत सुमारे 200 कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. त्यानंतर आयुक्तांनी जुने कंत्राट रद्द करून नव्याने निविदा मागविल्या आहेत. पूर्वी सफाईचे काम सुरू झाल्यावर आणि काम पूर्ण झाल्यावर छायाचित्र काढले जात होते. मात्र, त्याऐवजी आता व्हिडीओ शूटिंग करण्यात येणार आहे. 

दरम्यान, मिठी नदीच्या सफाईसाठी सुमारे 22 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव जानेवारी महिन्याच्या अखेरीस स्थायी समितीपुढे चर्चेसाठी आला होता; मात्र अद्याप मंजूर झालेला नाही. तसेच संपूर्ण नालेसफाईसाठी 125 कोटी रुपये खर्च होणार आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad