देवनार डंपिंग त्वरित हटवा - 'सेव्ह गोवंडी सेव्ह मुंबई'ची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 February 2016

देवनार डंपिंग त्वरित हटवा - 'सेव्ह गोवंडी सेव्ह मुंबई'ची मागणी

मुंबई / जेपीएन न्यूज नेटवर्क www.jpnnews.in
देवनार येथील डंपिंग ग्राउंड त्वरित हटवावे अशी मागणी 'सेव्ह गोवंडी सेव्ह मुंबई' या संघटनेने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत 'सेव्ह गोवंडी सेव्ह मुंबई' या संस्थेच्या वतीने माजी नगरसेविका राबिया शेख, अमन कमिटीचे अध्यक्ष फरीद शेख, वझिर कादरी, सलीम आलवारे, फिरोज मीठीबोरवाला सहभागी झाले होते. यावेळी बोलताना देवनार डंपिंग ग्राउंडमधे 4500 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला. डंपिंग ग्राउंडवर नुसता कचरा टाकला जात आहे कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नसल्याने या ठिकाणी 123 फूटा पेक्षा मोठे कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहे. कंत्राट दाराने योग्य वेळी कचऱ्याची विल्हेवाट लावली असती तर आज डंपिंगमधे सतत आग लागलीच नसती. आज आगी मूले येथील व् आजुबाजुच्या लाखो लोकाना श्वसनाचे आजार निर्माण झाले आहेत. अश्या लोकासाठी महापालिकेने मेडिकल क्याम्प लावावे आणि डंपिग त्वरित मुंबईबाहेर हटवावे अशी मागणी करण्यात आली. देवनार डंपिंग हटवण्यासाठी लवकरच पालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Post Bottom Ad