मुंबई http://www.jpnnews.in
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८६ व्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित ‘शिवजयंती उत्सव’ अंतर्गत शिवाजी पार्कवरील छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यास महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांच्या हस्ते आज (दिनांक १९ फेब्रुवारी २०१६) पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी राज्याचे उद्योग मंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, उप महापौर अलका केरकर, महापालिका आयुक्त अजोय मेहता, माजी महापौर महादेव देवळे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) संजय देशमुख, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे कार्याध्यक्ष ल किसन जाधव, संयुक्त चिटणीस संजय शेटे, उप आयुक्त (परिमंडळ – ५) भारत मराठे, उप आयुक्त (परिमंडळ -२) आनंद वागराळकर, ‘जी/उत्तर’ विभागाचे सहायक आयुक्त रमाकांत बिरादर यांची मुख्य उपस्थिती होती.
दादर येथील शिवाजी पार्कवर झालेल्या मुख्य समारंभात महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या स्नॉर्कल (शिडी) च्या सहाय्याने माननीय राज्यपाल . चेन्नमनेनी विद्यासागर राव, महाराष्ट्राचे उद्योग मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री . सुभाष देसाई, महापौर स्नेहल आंबेकर या मान्यवरांनी शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन पुष्पांजली वाहिली. यानंतर महापौर बंगल्याच्या हिरवळीवर, विशाल समुद्राच्या पार्श्वभूमीवर व सकाळच्या प्रसन्न वातावरणात छोटेखानी सांस्कृतिक समारंभ झाला. त्यात माननीय राज्यपाल .चेन्नमनेनी विद्यासागर राव यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. महापौर स्नेहल आंबेकर अध्यक्षस्थानी होत्या. महापौरांच्या हस्ते माननीय राज्यपाल . चेन्नमनेनी विद्यासागर राव यांचा शाल, पुष्पगुच्छ प्रदान करुन सत्कार करण्यात आला. महापालिकेच्या संगीत व कला अकादमीच्या चमूने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित गौरवपर मराठी गीते सादर केली. चहापानानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
भारताचे प्रवेशद्वार (गेट वे ऑफ इंडिया) येथेही अभिवादनः भारताचे प्रवेशद्वार (गेट वे ऑफ इंडिया) येथे सकाळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीतर्फे आयोजित समारंभास महापौर स्नेहल आंबेकर, महापालिका आयुक्त अजोय मेहता, समितीचे कार्याध्यक्ष व माजी नगरसेवक किसन जाधव, संयुक्त चिटणीस संजय शेटे यांच्यासह महापालिकेच्या ‘ए’ विभागाचे सहायक आयुक्त सुरेंद्र चव्हाण हे मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास महापौर स्नेहल आंबेकर व महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
No comments:
Post a Comment