सिंचन घोटाळ्यावर फडणवीस यांची चुप्पी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 February 2016

सिंचन घोटाळ्यावर फडणवीस यांची चुप्पी

-  राष्ट्रवादी आिण भाजपचा भांडाफोड करण्यासाठी आप आंदोलन छेडणार
- जलसंपदा िवभागाचे माजी मुख्य अिभयंता िवजय पांढरे यांचा इशारा
मुंबई / जेपीएन न्यूज नेटवर्क www.jpnnews.in
काँगेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात राज्यातील सिंचन कामांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात यावी, असे  चितळे समितीच्या अहवालात ठळकपणे सूचित करण्यात आले होते. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी गप्प राहणे पसंत केले. असा आरोप आम आदमी पक्षाचे नेते आिण जलसंपदा िवभागाचे माजी मुख्य अभियंता िवजय पांढरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच राष्ट्रवादी आिण भाजपच्या या िमलीभग िवरोधात आप आंदोलन छेडणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

चितळे समितीचा अहवाल आल्यापासून राज्यातील भाजप सरकारने सिंचन प्रकरणाच्या चौकशीसाठी अद्यापही पाऊल उचलले नाही. चौकशी दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक िवभागाचे (एसीबी) अधिकारी  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गाडीपर्यंत सोडायला येत असतील तर काय कारवाई होणार ? असा सवाल पांढरे यांनी यावेळी केला. 

 बारामती मध्ये शरद पवार एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार यांना गाडीत फिरवत आहेत. अशा परस्थितीत सिंचन प्रकरणी काही कारवाई होण्याची अपेक्षा धरण्यात अर्थ नाही, असे पांढरे म्हणाले. सिंचन िवभागाच्या तब्बल ८८ निविदांमध्ये तारीख नसल्याचे चितळे अहवालात नमुद करण्यात आले आहे. असे असताना फडणवीस सरकार कोणत्या पुराव्याची वाट पाहात आहे, असा प्रश्न त्यांनी िवचारला.  

सिंचन घोटाळ्या प्रकरणी २४ प्रश्न उपस्थित केलेले पत्र पांढरे मुख्यमंत्र्यांना िलहिले असून त्याची प्रत त्यांंनी पत्रकारांना िदली. सिंचन घोटाळ्याच्या चौकशीतील फडणवीस सरकार करत असलेला वेळकाढूपणाचा भांडाफोड करण्यासाठी आम आदमी पक्ष राज्यभर आंदोलन करणार असल्याचे पांढरे यांनी पत्रकारांना सांगितले.  

पंकजच्या अटकेविना तपास अपूर्ण - आपच्या प्रीती मेनन-शर्मा यांचा दावा 
छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना जी कामे होत असत, त्याचा मोबदला म्हणून भुजबळ यांच्या बँक अकाऊंटला रक्कम जमा करण्यात येत होती. सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) भुजबळ कुटुंबियांवर केवळ तीन मुद्दयांवरतीच कारवाई केली आहे. आणखी सहा मुद्यांचा तपास होणे गरजेचे आहे, असा दावा आम आदमीच्या प्रवक्त्या प्रिती मेनन-शर्मा  यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. 

न्यायालयाने आदेश िदल्यानंतर भुजबळ कुटुंबियांची चौकशी सुरु झाली. भाजप सरकार राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती ठोस कारवाई करण्यात कचरत आहे.  त्यामुळे न्यायालयामार्फत आम आदमी पक्षाची लढाई यापुढेही चालूच राहणार आहे, असे शर्मा म्हणाल्या. छगन भुजबळ यांचा पुतण्या समीर यास अटक झाली आहे. मात्र भुजबळ यांचा मुलगा पंकज यास जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत भुजबळ कुटुंबियांनी काळा पैसा कायदेशीर करण्याबाबत केलेल्या गुन्ह्याचा (मनी लाँड्रीग) तपास पुर्ण होऊ शकत नाही, असा दावाही मेनन-शर्मा यांनी यावेळी केला.

Post Bottom Ad