बार्टी : अनुसूचित जातीच्या उमेदवारांना संधी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 February 2016

बार्टी : अनुसूचित जातीच्या उमेदवारांना संधी

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे ही स्थापन करण्यात आलेली आहे. या संस्थेच्यावतीने अनुसूचित जातीच्या अनुसूचीतील मांग, मातंग, मिनिनमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग, मांग-गारुडी समाजातील युवक-युवतींसाठी मोफत शिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे. 
या प्रशिक्षणाअंतर्गत या समाजातील युवक-युवतींसाठी बँका, रेल्वे, एलआयसी इत्यादींमध्ये लिपिक व त्या समकक्ष पदांच्या स्पर्धा परिक्षेच्या पूर्वतयारीसाठी निवास व भोजन व्यवस्थेसह 4 महिन्याच्या कालावधीचे पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अकोला व ठाणे या ठिकाणी मोफत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. खाजगी संस्थेच्या माध्यमातून हे प्रशिक्षण होणार आहे.

या प्रत्येक प्रशिक्षण केंद्रावर नमूद केलेल्या जातीमधील 50 युवक-युवतींना प्रवेश देण्यात येईल. 30 टक्के जागा मांग व वर नमूद तत्सम जातीतील महिलांकरीता राखीव आहेत. 3 टक्के जागा मांग व वर नमूद तत्सम जातीतील दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव आहेत.

वरील जातीच्या इच्छुक व पात्र युवक-युवतींनी https://barti.maharashtra.gov.in या वेबसाईटवरुन Notice Board या सदराखाली Coachings-Mang-Matang लिंकवरुन अर्ज डाऊनलोड करुन घेता येतील किंवा पुढील नमूद संस्थेच्या कार्यालयातून अर्ज प्राप्त करुन पुढील ज्या ठिकाणी उमेदवारांना प्रशिक्षण घ्यावयाचे आहे त्या ठिकाणी दिनांक 20 फेब्रुवारी, 2016 पर्यंत परिपूर्ण भरलेले अर्ज कागदपत्रासह सादर करावे. 

1) स्वप्नपूर्ती सेवाभावी संस्था - व्हिजन ॲकडमी, शॉप नं. 11, 985 बहुपती कॉम्प्लेक्स, सदाशिव पेठ, ज्ञानप्रबोधनी समोर, पुणे - 30, मोबाईल क्रमांक - 9763950361, ठिकाण - पुणे.
2) चक्रधर स्वामी सेवाभावी व शैक्षणिक संस्था नाशिक - फतेह हॉस्टेल, शंकरनगर, टाकळी रोड, नाशिक- 422 001, मोबाईल क्रमांक - 9689998444 ठिकाण - नाशिक.
3) महाराष्ट्र मातंग विकास मंडळ - प्लॉट नं. 105, आराधना सोसायटी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉलेजच्या बाजूला, एच.पी पेट्रोल पंपाजवळ, गोदनी रोड, नागपूर, मोबाईल क्रमांक - 7769075665/9372090636, ठिकाण - नागपूर.
4) अस्मिता मागास वर्ग बहुउद्देशीय विकास व संशोधन संस्था, अकोला - स्पर्धा परीक्षा केंद्र, बाजोरीया नगर, हिंगणा रोड, अकोला. मोबाईल क्रमांक - 9503020011, ठिकाण - अकोला.
5) श्री. जी. बहुउद्देशीय संस्था - प्लॉट नं. 5, एम.आय.डी.सी. स्टेशन रोड, ता. जि. औरंगाबाद. मोबाईल क्रमांक - 8888788756/9921600299. ठिकाण - औरंगाबाद.
6) मानसी महिला औद्योगिक सहकारी संस्था, ठाणे - ओम को. ऑ. सोसायटी, बिल्डिंग नं. 4, अशोक वन सोसायटी, निमकर नाका नगर, मनसे ऑफिस, टिटवाळा (पूर्व), जिल्हा ठाणे. मोबाईल क्रमांक - 9029011818, ई-मेल - mansimahila19@gmail.com ठिकाण - ठाणे. 

योजनेच्या अटी व शर्ती : (1) उमेदवार हा मांग किंवा वर नमूद तत्सम जातीचा असावा. (2) उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. (3) उमेदवाराचे वय 18 ते 35 पर्यंत असावे. (4) उमेदवार किमान 12वी पास असावा. (5) निवड केलेल्या उमेदवाराच्या प्रशिक्षणादरम्यान निवासाचा व भोजनाच्या खर्चासाठी शासन निर्णयानुसार ''बार्टी'' कडून वर नमूद संबंधित संस्थेला निधी देण्यात येईल व उमेदवारासाठी नि:शुल्क निवास व भोजन व्यवस्था संबंधित संस्थामार्फत करण्यात येईल. (6) उमेदवारांना ''बार्टी'' मार्फत लिपिक स्पर्धा परीक्षा तयारीसाठी रु. 3000/- किंमतीचे पुस्तकांचा संच देण्यात येणार आहे. (7) विहित नमुन्यामध्ये आवश्यक कागदपत्रांस‍हीत प्रशिक्षण संस्थेकडे अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांपैकी पात्र उमेदवाराची त्या त्या संस्थेच्या ठिकाणी संस्थेच्या परिसरात किंवा संस्थेने सुचविलेल्या इतर परिसरात दि. 28/02/2016 रोजी चाळणी परीक्षा घेऊन त्यामधून उमेदवारांची गुणानुक्रमे निवड करुन प्रशिक्षणासाठी प्रवेश देण्यात येईल. (8) संबंधित प्रशिक्षण संस्थेकडे अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 20 फेब्रुवारी, 2016 असा आहे. (9) सदर प्रशिक्षण दि.01/03/2016 पासून किंवा त्यानंतर लवकरात लवकर सुरु करण्यात येईल. 

अर्जासोबत जोडवयाची कागदपत्रे : (1) उमेदवाराचे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो (2) जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत (3) इ. 12वी उत्तीर्ण गुणपत्रिका प्रत व इतर शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती (4) शाळा सोडल्याचा दाखला किंवा वास्तव्याच्या योग्य पुराव्याची साक्षांकित प्रत जोडावी. 

सविस्तर माहिती https://barti.maharashtra.gov.in या वेबसाईटवरुन Notice Board या सदराखाली Coaching-Mang-Matang लिंकवर पाहता येईल. 

देवेंद्र भुजबळ
संचालक (माहिती)(प्रशासन)
'महान्यूज' मधून साभार 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad