मुंबईला मीथेन ग्यासच्या टाईम बॉम्बचा धोका - रईस शेख - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 February 2016

मुंबईला मीथेन ग्यासच्या टाईम बॉम्बचा धोका - रईस शेख

पालिका आयुक्तांनी मुंबईकराना वाचवावे
मुंबई / अजेयकुमार जाधव / JPN NEWS www.jpnnews.in 
मुंबईच्या देवनार डंपिंग ग्राउंडवर गेले कित्तेक वर्षे जमा झालेल्या कचऱ्यामधे मीथेन हा ग्यास निर्माण झाल्याने आग लागली आहे. मीथेन हा ग्यास घातक असून एखाद्या टाईम बॉम्बप्रमाणे आहे. यामुले डंपिंगमधील कचऱ्यातील मीथेन ग्यास बाहेर काढण्यासाठी पालिका आयुक्तानी आयआयटी, पालिका अधिकारी आणि वैज्ञानिक यांचा समावेश असलेली कमिटी स्थापन करावी आणि मुंबईकर नागरिकाना होणाऱ्या आरोग्याच्या त्रासातून मुक्त करावे अशी मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी पत्रकार परिषदेत केली.

देवनार डंपिंग ग्राउंडवर लागलेल्या आगी संदर्भात बोलताना मी प्रशासनाला कळवले तरी प्रशासन गंभीर नव्हते. डंपिंगला आग लागली असताना मुख्य अग्निशमन अधिकारी मुंबई बाहेर होते. मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यानी तर आग बुझवण्याची जबाबदारी आमची नसून कंत्राटदाराची आहे असे सांगत आपली जबाबदारी झटकली असा आरोप शेख यांनी केला. पालिका आयुक्तांना प्रकरणाची गंभीरता कळवल्यावर आयुक्तानी डंपिंगला भेट दिली. त्यानंतर प्रशासन आणि अग्निशमन दल हरकतीत आले असे शेख म्हणाले.

देवनार डंपिंगवर गेले 90 वर्षे कचरा टाकला जात आहे. या ठिकाणी सातत्याने आगी लागत आल्या आहेत. परंतू ही आग कंत्राटदाराचे कंत्राट रद्द होत असताना ज्याना याची वैज्ञानीक माहिती आहे अश्या लोकांनी ही आग लावली असल्याचे शेख म्हणाले. प्रशासन आग विझवण्यात कमी पडल्याने मी स्वता आयआयटीशी संपर्क साधला असता आयआयटीने रिपोर्ट दिला आहे त्या रिपोर्ट प्रमाणे मीथेन ग्यास कचऱ्यामधून काढणे जरुरी असल्याचे म्हटले आहे.

आयआयटी कचऱ्यामधील मीथेन ग्यास काढण्यास तयार आहे. यामुले पालिका आयुक्तांनी आयआयटी, निरी आणि महापालिका अधिकारी यांची समिती नेमावी. या समितीचा अहवाल एक महिन्यात सादर करण्यात यावा अशी मागणी शेख यांनी केली. युपीए नामक कंपनीला कंत्राट देताना असंख्य चुका झाल्या आहेत. देवनार डंपिंगच्या कंत्राटात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोपही शेख यांनी केला. मुंबईकर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पालिका आयुक्तांनी स्वता पुढाकार घेवून मीथेन ग्यासमुले होणाऱ्या आजारापासून आणि प्रदुषणापासून वाचवावे असे आवाहन शेख यांनी केले.

महापौरांचा निषेध - सत्ताधारी नापास
देवानर डंपिंगला आग लागली असताना सत्ताधारी अंदमान दौऱ्यावर होते. दौऱ्यावरुन मुंबईत परतल्यावर सत्ताधारी पक्षाच्या महापौर, सभागृह नेत्या, स्थायी समिती अध्यक्ष व इतर पदाधिकारी नगरसेवकानी डंपिंगला भेट दिली. या भेटी वेळी मुंबईच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर स्नेहल आंबेकर याना आपल्या शहरातील नागरिक कोणत्या प्रसंगाला तोंड देत आहेत याची जरा सुद्धा जाणीव नसल्याचे दिसले. डंपिंगच्या आगी आणि धुरामुले नागरिक त्रस्त असताना महापौर मात्र गाँगल लावून परिस्थितीची पाहणी करत होत्या. त्यांना स्थानिक नगरसेवकांना बोलवण्याचे सुद्धा सुचले नाही हां प्रकार निषेधार्य असल्याचे रईस शेख यांनी म्हटले आहे. मुंबई शहरात 20 वर्षे शिवसेना भाजपा यांची सत्ता असताना नागरिकाना चांगले रस्ते, खड्डे मुक्त रस्ते, कचरामुक्त मुंबई, शौचालय, पाणी इत्यादी सुविधा देता आलेल्या नाहित. सेना भाजपा नापास ठरली असून सत्ताधाऱ्याना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही असे शेख यांनी म्हटले आहे.

Post Bottom Ad