मुंबई / JPN NEWS www.jpnnews.in
गेल्या वर्षभरात पोलिसांना मारहाणीच्या २०१ घटना घडल्या. याप्रकरणी २४३ जणांना अटक करण्यात आली आहे. खाकी वर्दीवाले कर्तव्य बजावीत असताना त्यांना प्रतिकार करण्याचे त्यांच्या कमात हस्तक्षेप करण्याचे प्रकार वाढत असल्याने खाकीच असुरक्षित असल्याचे दिसत आहे.
पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांचा पासपोर्ट आणि वाहन परवाना रद्द करण्यात यावा, अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्यात यावा, अशा आरोपींना सरकारी नोकरी मिळू नये, पहिल्या हल्ल्यानंतर त्यांच्याकडून बॉण्ड लिहून घेत दुसऱ्या हल्ल्यानंतर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असे आदेश तीन वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी दिले होते. ते वगळता कडक धोरण स्वीकारले गेले नाही, त्यामुळे या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. गतवर्षी १८८ गुन्ह्यांची उकल झाली. २०१४ च्या तुलनेत यामध्ये ६४ गुन्ह्यांची भर पडली आहे. पूर्व उपनगरात गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक असून तेथे गतवर्षात पोलिसांवरील हल्ल्याचे ७५ प्रकार घडले.