महापालिका शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षणाच्या दर्जा प्रमाणे अर्थसंकल्पात घट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 February 2016

महापालिका शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षणाच्या दर्जा प्रमाणे अर्थसंकल्पात घट


मागील वर्षा पेक्षा अर्थसंकल्प १०६ कोटी रुपयांनी कमी झाला
मुंबई / अजेयकुमार जाधव / जेपीएन न्यूज नेटवर्क www.jpnnews.in
मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा सन २०१६ - १७ साठीचा २३९४.४० कोटी रुपयांचा आणि ३० लाख रुपयांच्या शिलकीचा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी शिक्षण समिती अध्यक्ष रितू तावडे यांच्याकडे सादर केला. सन २०१६- १७ साठी महसुली उत्पन्न आणि खर्चाचा अंदाज २०६९.५३ कोटी इतका तर भांडवली कामांचा अर्थसंकल्पीय अंदाज ३२४.५७ कोटी इतका अंदाजीत करण्यात आला आहे. सन २०१५ - १६ च्या २५०१ कोटीच्या कोटीच्या तुलनेत सन २०१६-१७ चा अर्थसंकल्प १०६ कोटी रुपयांनी कमी झाला आहे. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या आणि दर्जा खालावत असताना शिक्षण विभागाचा अर्थसंकल्पही कमी झाला आहे. 

महापालिकेच्या शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर करताना सन २०१५ - १६ मध्ये आठवीच्या २२७९९ विद्यार्थ्यांना विमा संरक्षणासह वितरीत करण्यात आले आहेत.शाळांमध्ये १४७९१ इको फ्रेंडली बेंच व डेस्क पुरवण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली असून हे बेंच आणि डेस्क मार्च २०१६ पर्यंत पुरवठा होईल असे दराडे यांनी सांगितले. महापालिका शिक्षण विभागातील शिक्षकांच्या सुप्त कलागुणांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी १० फेब्रुवारीला २०१६ला शिक्षकोत्सव हा उपक्रम साजरा केला जाणार आहे. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी खाजगी शाळांमधील शिक्षकांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी भगिनी शाळा हि योजना सुरु करण्यात येणार असल्याचे दराडे यांनी सांगितले. 

सन २०१६ - १७ च्या शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पात कॉम्प्यूटर ल्याब निर्मितीसाठी १७.६८ कोटी रुपयांची,विज्ञान प्रयोगशाळा निर्मितीसाठी १५ कोटी, मिनी सायन्स सेंटर उभारणीसाठी ४ कोटी ४५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शालेय इमारतींच्या दुरुस्ती आणि दर्जोन्नती व पुनर्बांधणीसाठी२२७ कोटी ४२ लाख रुपयांची तरदूत करण्यात आली आहे. शालेय इमारतींमध्ये आरोग्यदायी प्रसाधनगृहे उपलब्ध करून देण्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या ५०४ बालवाड्यामध्ये टॉय लायब्ररी सुरु करण्यात येणार आहे त्यासाठी १ कोटी ७६ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. 

महापालिका शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ११२० टेबल तसेच १३१४ खुर्च्या खरेदी केल्या जाणार आहेत. टेबलसाठी ९२ कोटी ८२ लाखांची तर खुर्च्यांसाठी ६७ कोटी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.महापालिका शाळांमधील ८ वि ते १० वीच्या करियर आणि कौशल्य प्राप्त करता यावे म्हणून व्होकेशनल ट्रेनिंग व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी ३ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.पालिका शाळांमधील पुस्तक आणि कपाटे खरेदी करण्यासाठी २ कोटी ३७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पवई हायलेवल स्काउट व गाईड शिबीर स्थळावर ३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. व्हर्चुअल क्लासरूमसाठी १५ कोटी ९७ लाख रुपयाची, सर्व शाळा इंटरनेट द्वारे जोडण्यासाठी ६८ लाख रुपयांची, शाळांमधील हाउसकीपिंग साठी ६४ कोटी ८३ लाख रुपयांची, तर सार्वजनिक ग्रंथालयांना ३० लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याचे दराडे यांनी सांगितले. 

विद्यार्थ्यांसाठी योजना आणि तरतूद 
८ वीच्या विद्यार्थ्यांना ट्याब १४ कोटी ३७ लाख 
शैक्षणिक साहित्य व वर-तू यांचा मोफत पुरवठा -103 .17 
विद्यार्थ्यांसाठी मुदत ठेव योजना  30 .18 
विद्यार्थ्यांसाठी बस भाडे - 11 .41

Post Bottom Ad