मुंबई / JPN NEWS www.jpnnews.in
बेकायदा स्टॉलवर कारवाई करणार्या जी दक्षिण विभाग कार्यालयातील कनिष्ठ अभियंत्याला शिवसेनेच्या शाखाप्रमुखाने मारहाण केल्याची घटना आज सकाळी घडली़ यामुळे संतप्त कर्मचार्यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली़ तर दुसरीकडे शिवसेनेचे कार्यकर्तेही जमा झाल्यामुळे काहीकाळ या विभाग कार्यालयामध्ये तणाव पसरला होता़
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मेक इन इंडिया कार्यक्रमाची तयारी सुरु आहे़ यासाठी दक्षिण मुंबईत स्वच्छता मोहीम राबविण्यात येतआहे़ या अंतर्गत सिद्धीविनायक मंदिरासमोर असलेल्या एका भज्जीपावच्या स्टॉलवर जी दक्षिण विभाग कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांनी कारवाई केली़ या कारवाईत भज्जीपावचा स्टॉलही हटविण्यात आला़ यामुळे नाराज स्थानिक शिवसैनिकांनी विभाग कार्यालय गाठले़ शाखाप्रमुख शैलेश माळी यांनी कनिष्ठ अभियंता हेमंत चंदने यांना शिवीगाळ, धक्काबुक्की व मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे़ या घटनेच्या विरोधात सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांच्यासह कर्मचार्यांनी पोलिस ठाणे गाठून एफआयआर दाखल केला आहे़