महापालिका शाळांमधे लागणार सेनेटरी न्यापकिन वेंडिंग मशीन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 February 2016

महापालिका शाळांमधे लागणार सेनेटरी न्यापकिन वेंडिंग मशीन

महापालिका शाळांत आता मिशन - २०० 
मुंबई / अजेयकुमार जाधव / http://www.jpnnews.in 
मुंबई महानगरपालिका शाळामधील वयात आलेल्या मुलींची मासिक पाळिच्या होणारी कुचंबना लक्षात घेवून सर्व शाळांमधे सेनेटरी न्यापकिन वेंडिंग मशीन लावल्या जाणार असल्याची माहिती शिक्षण समितीच्या अध्यक्षा रितू तावडे यांनी दिली. 

महापालिका शाळांमधे सुविधांच्या नावाने नेहमीच बोंब असते. अश्यात महानगरपालिका शाळांमधे शिकत असलेल्या विद्यार्थीनिंची वयात आल्यावर मासिक पाळीच्या दिवसात कुचंबना होत असते. अश्यावेळी विद्यार्थिनिंची होणारी कुचंबना कमी करण्यासाठी पालिकेच्या 452 शाळांच्या इमारतीमधे वेंडिंग मशीन लावण्यात येणार आहे. या मशीनमुले न्यापकिनची विल्हेवाट लावण्यास सोपे जाणार आहे. 452 शाळांच्या इमारतीमधे सेनेटरी न्यापकिन वेंडिंग मशीन लावण्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती रितू तावडे यांनी दिली. 

महापालिका शाळांत मिशन - २०० 
महापालिकेच्या इयत्ता दहावीतील हुशार विद्यार्थ्यांनी मेरीट लिस्टमध्ये यावे, यासाठी शिक्षण विभागाने मिशन-२०० ही संकल्पना सुरु केली आहे. विद्यार्थ्यांची टक्केवारी आणि गुणवत्ता सुधारावी, हा संकल्पनेमागचा उद्देश आहे. राज्यात महापालिकेच्या शाळांमध्ये प्रथमच ही योजना प्रायोगित तत्वावर सुरु केली आहे. 

मुंबई महापालिकेच्या शाळेत इयत्ता दहावीमध्ये २२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मागील वर्षी महापालिकेच्या शाळांचा ७२ टक्के निकाल लागला होता. यंदा निकालात वाढ करण्यासाठी पालिकेने २२ हजार विद्यार्थ्यांपैकी २०० विद्यार्थ्यांची निवड केली आहे. भायखळा, घाटकोपर आणि अन्य चार केंद्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले जात आहे. त्यासाठी पालिका शाळांबाहेर तज्ञ शिक्षकांची मदत घेतली आहे. गेल्या आठ महिन्यापासून हे शिक्षक विद्यार्थ्यांना विनामुल्य मार्गदर्शन करीत आहेत. पालिका शाळांचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी ही योजना राबवित असल्याची माहिती शिक्षण समिती अध्यक्षा रितू तावडे यांनी दिली. 

कौशल्य विकास योजना पालिका शाळांमध्ये दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षण घेतात. घरची बेताची परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना अर्धवट शिक्षण सोडावे लागते. तर काहींना शिक्षणात रूची नसल्याने शाळा सोडतात.  अशा विद्यार्थ्यांकरिता कौशल्य विकास योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना विविध कला शिक्षण अवगत होण्यास मदत होईल

पालिका शाळांमधील शौचालये सुधारणारस्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून महापालिका शाळांमधे स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पालिका शाळांमधील शौचालयांचे नुतनीकरण केले जाणार आहे. शौचालयामधील चीनी माती पासून बनवलेली भांडी बदलण्यात येणार असून त्याजागी स्टेनलेसस्टीलची भांडी बसवली जाणार असल्याचे रितू तावडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad