'रेस्टॉरंट, हॉटेल मधील कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेची विशेष सुविधा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 February 2016

'रेस्टॉरंट, हॉटेल मधील कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेची विशेष सुविधा

याअंतर्गत दररोज सरासरी २८२ मे. टन कच-याचे व्यवस्थापन
मुंबई http://www.jpnnews.in 
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कच-याचे व्यवस्थापन सुयोग्य प्रकारे व्हावे, यासाठी महापालिकेचा 'घनकचरा व्यवस्थापन' विभाग दिवस रात्र कार्यरत आहे. विशेष म्हणजे रेस्टॉरंट्स, हॉटेल्स यामधील कचरा (Hotel Waste) गोळा करण्यासाठी रात्रपाळी दरम्यान संपूर्ण कार्यवाही केली जाते. या अंतर्गत महापालिका क्षेत्रातील साधारणपणे २४२१ हॉटेल्स, रेस्टॉरंट्स इत्यादी मधून महापालिकेच्या गाड्याद्वारे सदर कचरा गोळा केला जातो. यासाठी महापालिकेच्या साधारणपणे ५९ गाड्या अहोरात्र कार्यरत असतात व यांच्या द्वारे दररोज सरासरी २८२ मे. टन इतक्या प्रमाणात सदर कचरा गोळा करण्यात येत असतो.


संपूर्ण महापालिका क्षेत्रातून दररोज साधारणपणे ९,६०० मे. टन कचरा गोळा करुन त्याचे व्यवस्थापन करण्याचे कार्य महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात येत असते. यात हॉटेल्स / रेस्टॉरंट्स मधून दररोज निर्माण होणा-या कच-याचा समावेश असतो. यामध्ये सर्वाधिक म्हणजे सरासरी ३० मे. टन इतका कचरा (Hotel Waste) 'के/पूर्व' विभागातील १०८ हॉटेल्स मधून तर त्या खालोखाल सरासरी २६ मे. टन कचरा 'ए' विभागातील १३० हॉटेल्स मधून व साधारणपणे २४ मे. टन कचरा 'के/पश्चिम' विभागातील १८७ हॉटेल्समधून गोळा केला जातो. तर सर्वात कमी कचरा `इ' विभागातील ८० हॉटेल्स व `एफ / दक्षिण' या विभागातील ५१ हॉटेल्स मधून प्रत्येकी ५ मे. टन इतक्या प्रमाणात गोळा केला जातो.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad