'शेतकऱ्यांची आत्महत्या आता फॅशन बनलीय' - भाजपाच्या खासदाराची मुक्ताफळे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 February 2016

'शेतकऱ्यांची आत्महत्या आता फॅशन बनलीय' - भाजपाच्या खासदाराची मुक्ताफळे

मुंबई http://www.jpnnews.in 
सर्व शेतकऱ्यांच्या आत्महत्या बेरोजगारी किंवा उपासमारीमुळे होत नाहीत, यासंबंधीची एक फॅशनच आली आहे, असे विधान करून भाजपचे मुंबईतील खासदार गोपाळ शेट्टी यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. राज्य सरकारच्या "जलशिवार‘ योजनेबाबत पत्रकारांशी बोलताना शेट्टी यांनी ही मुक्ताफळे उधळली. दरम्यान, आपल्याला फॅशन नव्हे तर स्पर्धा म्हणायचे होते, असे स्पष्टीकरण शेट्टी यांनी दिले आहे. 


येत्या काही वर्षांत दुष्काळाचा प्रश्न मार्गी लागेल. अशाप्रकारचे बदल हे एका रात्रीत घडत नाहीत. मात्र, सगळ्याच आत्महत्या या बेरोजगारी किंवा उपासमारीमुळे होत नाहीत, हल्ली ही एक फॅशन झाली आहे. लोकांना सवयच लागली आहे, असे गोपाळ शेट्टी म्हणाले. याशिवाय, सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत ही केवळ राज्या-राज्यांतील स्पर्धेचा भाग असल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली, की अन्य राज्यांतील सरकारे लगेचच 7-8 लाख रुपयांची घोषणा करतात. शेतकऱ्यांना मदत देण्याची स्पर्धाच लागली आहे, असेही शेट्टी म्हणाले.

कॉंग्रेसची टीका 
शेट्टी यांच्या या वक्तव्यावर कॉंग्रेसने टीकेची झोड उठवली आहे. शेट्टी यांनी माफी मागावी आणि त्याबद्दल मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी त्यांना जाहीर समज द्यावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. अशोक चव्हाण यांनी तर शेट्टींचा एकेरी उल्लेख करीत सरकारची हद्द झाल्याचा इशारा दिला. मोहन प्रकाश यांनी तर शेट्टींना तुम्हीही अशी फॅशन करून जरा बघाच, असा सल्ला दिला. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad