खऱ्या मुंबईवाल्यांचे कौतुक करण्यासाठी मुंबई सज्ज - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 February 2016

खऱ्या मुंबईवाल्यांचे कौतुक करण्यासाठी मुंबई सज्ज

मुंबई http://www.jpnnews.in : 
मुंबईकर नागरिकांचा रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चहावाला, भाजीवाला, रिक्षावाला, डबेवाला, दुधवाला अश्या विविध वालांशी संपर्क येत असतो. अश्या या लोकानी मुंबईकराना सेवा देवून मुंबईकर नागरिकांचे जीवन सोपे केले आहे. अश्या या खऱ्याखुऱ्या "मुंबईकरांच्या" उत्साहाचे कौतुक करण्यासाठी कनकिया समुहाने पाऊल उचलले आहे. या उपक्रमाचा एक खास उपक्रमाचा भाग म्हणून विवध वालांच्या चित्रांची स्पर्धा आणि चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले जाणार असल्याची माहिती कनकिया समूहाचे संचालक हिमांशू कनकिया यांनी दिली आहे.   
कनकिया आर्ट फौंडेशन या संस्थेने मुंबई मेरी जान हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये मुंबईकर नागरिकांच्या दररोज संपर्कात येणाऱ्या चहावाला, भाजीवाला, रिक्षावाला, डबेवाला, दुधवाला अश्या विविध लोकांच्या सेवांची दखल मुंबईकरांनी घ्यावी म्हणून त्यांचा समावेश करण्यात आहे. मुंबईकरांनी अश्या सेवा देणाऱ्या लोकांची छायाचित्रे मुंबई मेरी जान उपक्रमाकडे पाठवावीत. अश्या छायाचित्रांचे प्रख्यात छायाचित्रकार अतुल कस्बेकर यांच्या मार्फत मूल्यमापन केले जाणार असून निवडक फोटोना कनाकिया झिलियन, बीकेसी एनेक्स, बांद्रा मुंबई येथील आर्ट ग्यालरीत प्रदर्शित केले जाणार आहे. वृत्तपत्रात काम करणारे छायाचित्रकार यांच्यासाठीही स्पर्धा खुली असून त्यांच्यासाठी विशेष गट करण्यात आला आहे. प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात येणाऱ्या उत्कृष्ट अश्या छायाचित्राला ५ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी www.mumbaimerijaan.com या वेबसाईटला भेट द्यावी असे आवाहन कनकिया समूहाचे संचालक हिमांशू कनाकिया यांनी केले आहे.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad