शाहरुख खान ने पालिकेस अदा केले 1,93,784 रुपये - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 February 2016

शाहरुख खान ने पालिकेस अदा केले 1,93,784 रुपये

मुंबई / JPN NEWS www.jpnnews.in
मोठ मोठे सिने अभिनेते रुपेरी पडद्यावर प्रेरणादायक असतात पण प्रत्यक्षात सामाजिक जीवनात खलनायक समान ठरतात. शाहरुख खान यांनी घराच्या बाहेरील रस्त्यावर अनधिकृतपणे बनविलेल्या आरसीसी रैंप तोडल्यानंतर कारवाईचा एकूण खर्च 1,93,784/- रुपये पालिकेस अदा केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस पालिका प्रशासनाने दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिका प्रशासनाकडे शाहरुख खान यांचे तोडलेले आरसीसी रैंपवर आलेला कारवाईचा खर्च आणि अदा केलेली एकूण रक्कम याची माहिती मागितली होती. बांद्रा एच पश्चिम पालिका वार्ड कार्यालयातील सहायक अभियंता (परिरक्षण) यांनी अनिल गलगली यांस कळविले की पालिका आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर दिनांक 6 फेब्रुवारी 2015 रोजी 'मन्नत' या बंगल्यास नोटीस देत 7 दिवसाची वेळ शाहरुख खान यांस देण्यात आली होती. वेळ संपताच दिनांक 14 फेब्रुवारी आणि 15 फेब्रुवारी 2015 या 2 दिवसात आरसीसी रैंप तोडक कारवाई करण्यात आली.

शाहरुख खान यांच्यावर आरोप होता की बांद्रा पश्चिम येथील बैंडस्टैंड समीप असलेल्या एच के भाभा रोड आणि माउंट मेरी रोड या पीछेहाटीची जागा ( सेटबेक) अतिक्रमित केली होती. पालिकेने 4 मार्च 2015 रोजी शाहरुख खान यांस पत्र पाठवून तोडक कारवाईचा झालेल्या खर्चाची म्हणजे 1,93,784/- रुपयांची मागणी केली होती आणि 7 दिवसात पैसे अदा न केल्यास एमएमसी एक्ट मधील नियमाअंतर्गत कार्यवाहीची चेतावनी दिली होती.
शाहरुख़ खान यांनी दिनांक 11 मार्च 2015 रोजी सिटी बैंकेचा धनादेश द्वारे 1,93,784/- रुपये अदा करत प्रकरण बंद केले. शाहरुख खान प्रमाणे प्रसिद्ध उद्योगपति मुकेश अंबानी यांनी सुद्धा पीछेहाटची जागा स्व:ताच्या सुरक्षाच्या नावाखाली अंटालिया इमारत बांधताना अतिक्रमित केली होती. अनिल गलगली यांच्या पाठपूराव्यानंतर 4 वर्षानी अंबानी यांनी स्व:ताहून अतिक्रमित बांधकाम तोडले होते आणि नामुष्की टाळली होती.

Post Bottom Ad