मुकेश धावडे
मुले व पालकांच्या बदलत्या दैनंदिन जीवनशैलीमुळे आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात मुलांमधील हृदयविकारांच्या वाढत्या समस्या लक्षात घेऊन या प्रमाणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच एक आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आपणा सर्वांना विचारशील प्रयत्न करून जागरूक राहण्याची गरज असल्याने दादर येथील 'श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर ट्रस्ट' आणि परळ पूर्व येथील 'बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल यांच्या सयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही 'लिटील हार्टस मॅरेथॉन' या कार्यक्रमाचे आयोजन सिद्धिविनायक मंदिर पासून ते वाडिया रुग्णालय पर्यंत आज करण्यात आले होते.

यात सहभाग घेतलेल्या पाल्य व पालकांनी समाजाला प्रेराणादायी ठरणारे व जागृती घडवून आणणारे संदेश दिले. त्यात स्त्री भ्रूण हत्या, पर्यावरण वाचवा, झाडे लावा - झाडे जगवा हाच आरोग्यदायी जीवनाचा कानमंत्र आहे असे एका अनेक संदेश या मॅरेथॉन दरम्यान देण्यात आले. या मॅरेथॉन'चे उदघाटन मुंबई महापौर स्नेहल आंबेकर आणि सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या हस्ते झेंडा फडकवून करण्यात आले. यावेळी सिद्धिविनायक मंदिर न्यास चे अध्यक्ष नरेंद्र राणे, वाडिया समूहाचे व्यवस्थापकीय संचालक नेस वाडिया, रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला, अधीक्षक अश्विनी जोगाडे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या उदघाटनसाठी उपस्थित असलेल्या मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर म्हणाल्या, कि ‘‘हा एक अतिशय नेटका उपक्रम असून मुलांमध्ये हृदयरोगाशी निगडित समस्यांना आळा घालणे आणि निरोगी जीवन जगण्यासाठी त्यांना प्रेरित करणे यासाठी महत्वाचा आहे. लिटील हार्टस् मॅरेथॉन हा मुंबई शहरातील एक खूप खास असा जागरूकता उपक्रम आहे. अनेक पालकांना आपल्या मुलांमध्ये हृदयाशी निगडित विकार बळावत आहेत, याची जाणीव देखील नसते. जर या विकाराचे निदान वेळीच झाले आणि आवश्यक उपचार दिले गेले तर बालकांचे भवितव्य सुरक्षित आणि निरोगी राहते. त्यामुळे, वाडिया हॉस्पीटलतर्फे आयोजित मॅरेथॉन ही केवळ एक नियमित घडणारी घटना नसून निरोगी जीवनसाठी समाजाप्रती असलेली बांधिलकी आहे. वाडिया हॉस्पीटलने हा एक उत्तम आदर्श घालून दिला आहे असे गौरउदगार आंबेकर यांनी व्यक्त केले.’’
''एक आई म्हणून मला मुलांमधील कार्डीयक आजाराच्या प्रतिबंधाविषयी जागरुकतेचा प्रसार करणा-या या थोर कार्याला समर्थन करताना आनंद होत आहे. अशा मोठया व्यासपीठावर हा उपक्रम राबविण्याकरिता मी मुलांचे बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल व श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अभिनंदन करते.'' असे या उपक्रमाचे कौतुक अभिनेत्री शिल्पा शेट्टी - कुंद्रा हिने केले. तर यंदा मॅरेथॉनमध्ये सुमारे 15 हजार मुले आणि त्यांचे पालक सहभागी झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे संख्या मोठी असून मुंबई शहराने निरोगी जीवनशैलीचे उपाय अंगीकारण्यास सुरुवात केलली असल्याचा हा उत्तम दाखला आहे. या मॅरेथॉनमधून संकलित झालेल्या निधीचा विनियोग सर्व अद्ययावत सुविधा आणि उपकरणांनी सुसज्ज असे एक कार्डियाक केअर युनिट उभारण्यासाठी आणि त्याद्वारे हृदयविकाराने ग्रस्त मुलांना परवडणा-या दरात उपचार पुरविण्यासाठी केला जाणार आहे. असे रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले.