सहा हजार कंत्राटी सफाई कामगारांची 132 कोटी रुपयांची थकबाकी पालिकेने अजून दिलेली नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 February 2016

सहा हजार कंत्राटी सफाई कामगारांची 132 कोटी रुपयांची थकबाकी पालिकेने अजून दिलेली नाही

मुंबई http://www.jpnnews.in - 22 FEB 2016 
देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या पालिकेने चक्क सहा हजार कंत्राटी सफाई कामगारांची 132 कोटी रुपयांची थकबाकी अध्याप दिलेली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे पालिकेने ही थकबाकी न दिल्यामुळे कामगारांची उपासमारीची वेळ आली असून कामगारांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे र-वच्छ भारतचा नारा देणारी पालिका कायदा पायदळी तुडवत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे

भारत र-वच्छ  अभियानाचा नारा देणा-या पालिकेच्या विविध विभागात सुमारे सहा हजार तथाकथित कंत्राटी कामगार सफाईचे काम करत असून त्यापैकी सुमारे 250 कामगार कुलाॅ एल विभागामध्ये मोटर लोडिंगचे काम करत आहेत मात्र आज 21 फेब्रुवारी तारीख उलटून गेली तरी अजून कामगारांचा पगार झालेला नाही अशीच परिस्थिती उच्च न्यायालय आणि मंत्रालय परिसरातील ए विभागात काम करणाऱ्या सफाई कामगारांची आहे या कामगारांचा पगार दर महिन्याच्या सात तारखेपयॅत होत असतो मात्र पालिकेने अजून कामगारांचा पगार दिलेला नाही तसेच राज्य सरकारने 24 फेब्रुवारी 2015 रोजी जाहीर केलेले सुधारित किमान वेतन अजूनही दिलेले नाही सहा हजार कामगारांची एकूण थकबाकी 132 कोटी आहे ही रक्कम पालिकेने मंजूर केलेली असताना अजून दिलेली नाही हे कामगार भारत र-वच्छता अभियानाचे काम करत असून ते दलित समाजातील आहेत पण या कामगारांवरच आज लाचारीने जगण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हजारो कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे पालिकेने कायदा तुडवत कामगारांवर उपासमारीची वेळ आणली आहे असा आरोप कचरा वाहतूक सश्रिक संघाने केला आहे याबाबत उद्या मंगळवारी संघाच्या वतीने हजारो कामगार पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेणार आहेत अशी माहिती संघाचे सरचिटणीस काॅ.मिलिंद रानडे आणि चिटणीस काॅ.विजय दळवी यांनी दिली आहे 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad