२0१५मध्ये १२७ चालक आणि ६२ सहप्रवाशांनाही जीव गमवावा लागला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 February 2016

२0१५मध्ये १२७ चालक आणि ६२ सहप्रवाशांनाही जीव गमवावा लागला

मुंबई / JPN NEWS www.jpnnews.in  दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्तीचा निर्णय घेण्याबरोबरच परिवहन विभागातर्फे सहप्रवाशालाही हेल्मेटसक्ती केली आहे. याविरोधात काही ठिकाणी विरोध केला जात असला तरी दुचाकीवरून प्रवास करताना सहप्रवाशाचाही जीव धोक्यात येत असल्याचे समोर आले आहे. मुंबईत २0१५मध्ये १२७ चालक आणि ६२ सहप्रवाशांनाही जीव गमवावा लागला आहे. 


दुचाकीचालकांप्रमाणेच सहप्रवासीही गंभीर जखमी झाल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. या अपघातांमध्ये जवळपास २४१ सहप्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. कुलाबा, पायधुनी, वडाळा, नागपाडा, भायखळा, वरळी, चेंबूर, घाटकोपर, मुलुंड, साकीनाका, वांद्रे, विमानतळ, मालाड, कांदिवली, बोरीवली विभागांतर्गत अपघातांची सर्वांत जास्त नोंद वाहतूक पोलिसांकडे झाली आहे. अपघातांत होणाऱ्या चालकाचे आणि सहप्रवाशाचे जाणारे मृत्यू पाहता हेल्मेटसक्ती करण्यासाठी परिवहन विभागाकडून कठोर पाऊल उचलण्यात येत आहे.
दुचाकीस्वार आणि त्याच्या सहप्रवाशाने हेल्मेट वापरणे हे योग्यच आहे आणि त्याची आम्ही कठोर अंमलबजावणीही करीत आहोत. त्यासाठी हेल्मेटचे उत्पादक आणि हेल्टेम विकणाऱ्या व्यापाऱ्यांनाही तसे निर्देश दिले आहेत. सर्व आरटीओंना दुचाकीची नोंद करताना हेल्मेटही विकत घेतल्याची माहिती कागदपत्रांत नमूद आहे का हे तपासण्यास सांगितले आहे.
- सतीश सहस्रबुद्धे, अतिरिक्त परिवहन आयुक्त, राज्य

Post Bottom Ad