मुंबई / जेपीएन न्यूज नेटवर्क / www.jpnnews.in
मुंबईतील लाखो भाडेकरुंवर वाढीव भाड्याचा भार लादणारा प्रस्तावित भाडे नियंत्रण कायदा रद्द करण्याची सरकारने केलेली घोषणा हा मुंबईकरांचा विजय आहे. हा प्रस्तावित कायदा रद्द व्हावा म्हणून मुंबई काँग्रेस आयोजित रविवार दि. ३१ जानेवारी, २०१६ रोजीचा ऑगस्ट क्रांती मैदान ते वर्षा बंगला (मुख्यमंत्री निवासस्थान) पर्यंत होणारा जाहिर मोर्चा रद्द करण्यात आलेला आहे, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले...मात्र सरकारविरोधातील काँग्रेस पक्षाचा संघर्ष सुरुच राहणार असून सरकारच्या धोरणाकडेही आमचे लक्ष असेल. सामान्य मुंबईकरांच्या हिताआड येणाऱ्या कोणत्याही धोरणाला आमचा विरोध कायम राहणार. भाडे नियंत्रण कायद्याच्या पुढील कार्यवाहीची रूपरेषा उद्या दुपारी ४.०० वाजता मुंबई काँग्रेस कार्यालयात होणाऱ्या पत्रकार परिषदेत सविस्तरपणे मांडली जाईल, सदर पत्रकार परिषदेत माजी खासदार मिलिंद देवरा सुद्धा उपस्थित राहणार आहेत, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले...
सदरचा प्रस्ताव कोणी आणला? त्यामागे कोण-कोण आहेत, बिल्डरांचा देखील यात समावेश आहे का? शिवसेना सत्तेत असूनही भाजपा सोबत रचलेले हे कटकारस्थान आहे का?, असे संजय निरुपम म्हणाले. येणाऱ्या बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेऊन प्रस्तावित भाडे नियंत्रण कायदा तात्पुरता रद्द केलेला आहे, असे निरुपम म्हणाले.