शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थी उपयोगी ॲप्सचे लोकार्पण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 January 2016

शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थी उपयोगी ॲप्सचे लोकार्पण

मुंबई / JPN NEWS.in / 1 Jan 2016
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आज बालाजी जाधव यांनी बनविलेल्या विद्यार्थी उपयोगी ॲप्सचे लोकार्पण करण्यात आले. जाधव यांनी इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी इंटरनेटशिवाय चालणारी (ऑफलाईन) विविध १६ ॲप्स बनविली असून त्यांचे लोकार्पण मंत्रालयात तावडे यांच्या दालनात करण्यात आले. यावेळी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंद कुमार उपस्थित होते. 
सदर ॲप्स www.balajijadhav.in या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येतील. जाधव हे माण तालुक्यातील (जि.सातारा) प्राथमिक शाळेत शिक्षक असून तंत्रज्ञानाच्या आधारे त्यांनी बनविलेल्या विद्यार्थी उपयोगी ॲपचे शिक्षणमंत्री तावडे यांनी कौतुक केले व श्री.जाधव यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad