प्रारूप विकास नियोजन आराखडा २०३४ - ३१ जानेवारी पर्यंत निरीक्षणे नोंदविण्याचे आवाहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 January 2016

प्रारूप विकास नियोजन आराखडा २०३४ - ३१ जानेवारी पर्यंत निरीक्षणे नोंदविण्याचे आवाहन

मुंबई / JPN NEWS.in  बृहन्मुंबई महापालिकेद्वारे तयार करण्यात आलेल्या प्रस्तावित 'प्रारूप विकास नियोजन आराखडा २०१४ - २०३४' बाबत महापालिकेच्या विकास नियोजन खात्याद्वारे पहिल्या टप्प्यात महापालिका क्षेत्रात नामनिर्देशन सर्वेक्षण (Designation Survey) करण्यात आले होते. आता दुस-या टप्प्यामध्ये 'प्रारुप विकास नियोजन आराखडा २०१४ – २०३४' मध्ये प्रस्ताविलेल्या विकास नियोजन रस्त्यांबाबतची माहिती महापालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेत स्थळावर दि. ७ जानेवारी २०१६ रोजी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाबाबत संबंधितांनी त्यांची निरीक्षणे (Observations) संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या विहीत नमुन्यात ३१ जानेवारी २०१६ पर्यंत नोंदवावीत, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिकेद्वारे करण्यात आले आहे.

महापालिकेद्वारे 'प्रारुप विकास नियोजन आराखडा २०१४ – २०३४' अंतर्गत दुस-या टप्प्यामध्ये केवळ प्रस्तावित विकास नियोजन रस्त्यांची नियोजनाच्या दृष्टीने फेर पडताळणी करुन प्रस्ताविलेले विकास नियोजन रस्ते कायम ठेवायचे आहेत किंवा रद्द करावयाचे आहेत; याबाबतची विभागनिहाय यादी महापालिकेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर यादी ही महापालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांमध्ये प्रदर्शित करण्यात येणा-या 'प्रारुप विकास नियोजन आराखडा २०१४ – २०३४' च्या नकाशांमध्ये चिन्हांकित केलेल्या रस्त्यांच्या अनुषंगाने पहावयाची आहे. या नकाशांमध्ये पूर्णपणे शेंदरी रंगाने दर्शविलेले रस्ते हे प्रस्तावित विकास नियोजन रस्ते आहेत. याबाबतचे तपशिलवार निवेदन महापालिकेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

तसेच ज्या भूभागावर महापालिकेने दि. २५ फेब्रुवारी २०१५ च्या आधी आय.ओ.डी. दिलेली आहे व ती वैध आहे अशा जागेवर जर प्रारुप विकास नियोजन आराखडा २०३४ मध्ये विकास नियोजन रस्ता प्रस्ताविलेला असेल आणि अशी बांधकामे बाधित होत असतील तर असे रस्ते रद्द करण्यासाठी इमारत प्रस्ताव खात्याने नोंद घेतल्याप्रमाणे प्रस्ताविले आहे. तरी देखील अशी काही प्रकरणे राहिली असल्यास संबधितांना आवाहन करण्यात येते की त्यांनी महापालिकेच्या विकास नियोजन खात्याकडे विहित नमुन्यात सदर निरिक्षणे ३१ जानेवारी २०१६ पर्यंत नोंदवावीत. सदर निरीक्षणे ee.dpr.mcgm.rd.survey.2015@gmail.com या इ-मेल पत्त्यावर किंवा पत्राद्वारे कळवावयाची झाल्यास खाली नमूद केलेल्या पत्यावर कळवावयाची आहेत. प्रमुख अभियंता (विकास नियोजन), ५ वा मजला, नवीन विस्तारित इमारत, बृहन्मुंबई महापालिका मुख्यालय, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई – ४००००१

वरील नुसार निरिक्षणे कळविताना इ-मेल च्या 'subject' मध्ये किंवा पत्राने कळवावयाचे झाल्यास पाकीटावर "विकास नियोजन रस्त्यांचे सर्वेक्षण डिसेंबर २०१५" अथवा “D.P. Road Survey December 2015" हे लिहिणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad